नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी भद्रावती शिवसेचाच गड असल्याचे सिध्द केले.
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुक्ताच पार पडला. नगराध्यक्ष पदासाठी (शिवसेनेना शिंदे गटा) चे उमेदवार प्रफुल चटकी यांनी विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर ताबा मिळवीला असून शिवसेनाने पुन्हा एकदा आपला गड कायम राखुन भद्रावती नगररीषदेवर भगवा फडकवीला.
माजी उपनगराध्यक्ष असलेले प्रफुल चटकी यांनी काँग्रेसचे उमेदवार सुनील नामोजवार यांचा ८२९ मतांनी पराभव करत विजय प्राप्त केला. प्रफुल चटकी यांना एकूण १०,३०४ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांना भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न दिल्याने सुनिल नामोजवार यांनी आयीन वेळेवर काँग्रेसपक्ष प्रवेश करत काँग्रेस पक्षाचा पंजा या चिन्हावर निवडणूक लढविली होती. यांना पहिल्या फेरी पासूनच अखेरच्या फेरी पर्यंत दुसऱ्या स्थानावर राहुन ९,४७५ मते मिळाली.
नुक्तेच काहि महिण्या पुर्वी भाजप मध्ये प्रवेश करून नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेले माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना पहिल्या फेरी पासुनच तिसऱ्या स्थानावर राहावे लागले. त्यांना एकूण ४९५२ मते मिळाली असून त्यांच्या प्रवेशाचा निकालावर काहीही प्रभाव पडला नसल्याचे दिसून आले.
विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्र.१ अ - उषा जाधव(काॅंग्रेस ६११), ब- महेश जीवतोडे(शिवसेना शिंदे गट ८००), प्रभाग क्रं.२ अ- राखी रामटेके(वंचित ३२०), ब- संदीप वडाळकर (शिवसेना शिंदे गट ३४१), प्रभाग क्रं.३ अ- पल्लवी तामगडे (काॅंग्रेस ४११), ब- सीमा पवार (अपक्ष ३२८), प्रभाग क्रं.४ अ- उर्वेला साव (वंचित ७९४), ब- रंजना गिरडकर (वंचित १२६४), प्रभाग क्रं.५ अ- राहूल सोनटक्के (शिवसेना शिंदे गट ८४३), ब- मंगला नन्नावरे (शिवसेना शिंदे गट ७०५), प्रभाग क्रं.६ अ- मंगेश सोनुलकर (बसपा ४५९), ब- सरिता सूर (काॅंग्रेस ५५८), प्रभाग क्रं.७ अ-वर्षा पढाल (शिवसेना उबाठा गट ६७३), ब- गौरव नागपुरे (शिवसेना उबाठा ७९५), प्रभाग क्रं.८ अ- योगेश गाडगे ( शिवसेना शिंदे गट १३४४), ब- गिरिजा बेहरे (शिवसेना शिंदे गट १२१२), प्रभाग क्रं.९ अ- संतोष कुरेकार (शिवसेना शिंदे गट ७८५), ब- शोभा पारखी (शिवसेना शिंदे गट ७१७), प्रभाग क्रं.१० अ- शिला कुळमेथे (शिवसेना शिंदे गट ७००), ब- सुधीर सातपुते (शिवसेना शिंदे गट ६२९), प्रभाग क्रं.११ अ-देवेंद्र गडपाले (शिवसेना शिंदे गट ६३२), ब- रेखा खुटेमाटे (शिवसेना शिंदे गट ११५६), प्रभाग क्रं.१२ अ- अनिल पडोळे (काॅंग्रेस ७९४), ब- वृषाली पांढरे (भाजपा ७०८), प्रभाग क्रं.१३ अ- जयश्री दुर्योधन (वंचित ५६६), ब- फय्याज शेख (राकाॅं शरद पवार गट ७५९), प्रभाग क्रं.१४ अ- प्रथम गेडाम (काॅंग्रेस २०८०), ब- कल्पना भुसारी(काॅंग्रेस ११७६), क- कविता सावनकर (भाजपा १००३) यांचा समावेश आहे. *केवळ एका मताने विजयी* एकूण १४ प्रभाग असलेल्या भद्रावती नगर परिषदेच्या प्रभाग क्रं.१२ ने मात्र भद्रावतीकरांना चांगलीच चपराक दिली.त्यात अ गटातून काॅंग्रेसचे अनिल पडोळे हे केवळ ३ मतांनी निवडून आले.त्यांना ७९४ मते मिळाली.तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश कटलावार यांना ७९१ मते मिळाली. तसेच ब गटातून भाजपाच्या वृषाली पांढरे ह्या केवळ एका मताने विजयी झाल्या. त्यांना ७०८ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काॅंग्रेसच्या कल्पना मत्ते यांना ७०७ मते मिळाली. विशेष म्हणजे भद्रावती नगर परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत शिवसेनेचीच सत्ता कायम राहिली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल जटाले आणि न.प.मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांनी योग्य कामगिरी बजावली.तसेच ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.


0 टिप्पण्या