Ticker

6/recent/ticker-posts

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले हाती धुपाटणे राहिले ... संजय मते

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-नागपूर कराराप्रमाणे     दरवर्षी महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे आयोजित केले जाते .यादरम्यान राज्याचा संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच सनदी ,प्रशासकीय अधिकारी येत असतात.अधिवेशनाचे कामकाज सुरु झाले की विदर्भातील शेतकरी , प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर,कामगार, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पीडित,अन्याय अत्याचार ग्रस्त नागरिकांना  आपल्या समस्या 
सुटतील अशी अपेक्षा असते 
परंतु सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सुटता सुटत नसून त्या अधिकाधिक जटिल कठीण होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांच्या अपेक्षांचा भाग होत असून नागपूर येथील हिवाळी अधिवेशन झाले  आणि तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे राहिले अशी अवस्था निर्माण झाली असल्याचे मत ओ बी सी क्रांती मोर्चाचे संयोजक संजय मते यांनी एका मुलाखती दरम्यान व्यक्त केले.
  खरे तर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकरी, प्रकल्प ग्रस्त शेतकरी,शेतमजूर ,सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पीडित नागरिक आपल्या समस्या घेऊन  धरणे आंदोलन,मोर्चे काढून तसेच निवेदने देऊन शासन प्रश्नाचे ध्यानाकर्षण करत असतात त्यामुळे या समस्यांची  शासन प्रशासनाच्या आणि आमदार यांनी वेळीच दखल घेऊन समस्या दूर करण्यासाठी लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन राज्यातील तमाम नागरिकांना दिलासा देणे ही शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ,लोकसेवक असलेल्या आमदारांची नैतिक जबाबदारी असताना समस्या निकाली निघत नाही हे  भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नागरिकांची ओरड आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नाही त्याचे काय? ग्रामीण भागात रोजगार स्थापन न करण्याचे कारण काय? सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळत नसल्याने त्यांचे जीवन उध्वस्त होत आहे त्याचे काय? प्रकल्प ग्रस्त शेतकरी व पूरग्रस्त नागरिकांचे  प्रश्न प्रलंबित ठेवण्याचे कारण काय?शाळेत  विद्यार्थी  आहेत पण कार्यरत शिक्षक नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो त्याचे काय ?शाश्वत विकास होत नसल्याने आमदारांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उभे ठाकले आहे त्याचे काय ? शाश्वत विकास न करण्याचे कारण काय ? याबाबत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी असलेले  पांढरपेशे आमदार हे विकास म्हणजे काय , विकासाच्या परिभाषेनुसार  आपापल्या मतदार संघातील विकास कामांचा पाढा वाचतील का ? कोणता आणि कसा विकास   झाला आणि केला व  करणार आहेत याचा जाहीर खुलासा करतील का ?  नागरिकांना विश्वासात घेऊन विकास न करण्याचे कारण काय ? असे प्रश्न ओ बी सी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी उपस्थित केले आहेत.
       भंडारा जिल्ह्यासह महाराष्ट्र
राज्यातील लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारांनी याबाबत दखल घेऊन नागरिकांच्या समस्या दूर करून सर्व सामान्य नागरिकांच्या हिताचा विकास करावा अन्यथा या विरोधात आमदारांच्या निवासासमोर  सत्याग्रह करण्याचा इशारा ओ बी सी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांचेसह पदाधिकाऱ्यांनी यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या