Ticker

6/recent/ticker-posts

पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांकरिता भंडारा येथील कमांडो चंद्रशेखर डोळस यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-पंढरपूर,,सोलापूर येथे  दिनांक 14 ते 16 डिसेंबर पर्यंत   युवकांसाठी  विविध प्रेरणादाई कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर येथील सामाजिक क्षेत्रातील अत्यंत उत्कृष्ट कार्य करणारे वामन  येलमार व प्रीती वामन  येलमार आणि  दानेश्वर महाराज अन्नछत्र संस्था पंढरपूर यांच्या मार्फत करण्यात आले. यात युवकांना पूर्णपणे मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण ,वेगवेगळे आहेत क्रीडा प्रकार, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर, सोलापूर, आणि परिसरातील युवकांसाठी आयोजन करण्यात आले होते,,आणि युवकांना आकर्षित क्रीडा पुरस्कार देण्यात आले,यात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्वांना आमंत्रित करण्यात आले, येथील युवकांच्या विशेष मागणीसत्व भंडारा जिल्ह्यातील चंद्रशेखर डोळस,माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते संस्थापक कमांडो ग्रुप भंडारा, यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते,पश्चिम महाराष्ट्रातील या तरुणांना त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या