चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-उदगीर तालुक्यात यंदा पावसाने सर्व सिमारेषा ओलांडल्याने सर्वञ पाणी व पाणीच दिसत आहे.म्हणुन या वर्षी हंडरगुळी परिसरात ऊसाचे क्षेञ वाढणार असल्याचे जाणकार शेतक-यांमध्ये बोलले जाते.
येथे तिरु मध्यम प्रकल्प असल्यामुळे या परिसरातील शेतक-यांना ऊस व अन्य पिकांना पाणी मुबलक मिळते. म्हणुन या परिसराची ओळख ग्रीन बेल्ट अशी आहे.
यंदा परिसरामध्ये सर्वञ पावसाने धुमाकूळ घातल्याने सर्वदुर पाणीच पाणी असे चिञ दिसून येते. परिणामी ऊसाचे क्षेञ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हंडरगुळी परिसरातील शेतक-यांचा हुकमी एक्का सोयाबीन. यानंतर ऊस यापैकी अतिपावसामुळे सोयाबीनचे खोयाबीन झाले असून पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली. असल्याने कोणत्या जातीच्या ऊसाची लागवड करावी.हाच विचार अनेकजण करत आहेत.
कारण,मुग,उडीद,सोयाबीन प्रमाणेच ऊस पण नगदी दाम देणारे पिक आहे. पण मागच्या कांही वर्षात निसर्गाने साथ दिली नसल्यामुळे या परिसरात ऊसाचे क्षेञ वाढले नव्हते. पण यंदा भर'पूर'पाऊस झाल्याने हंडरगुळी,मोरतळवाडी, चिमाचीवाडी .रुद्रवाडी,नागदरवाडी, चिद्रेवाडी,आनंदवाडी, अढळवाडी, सुकणी,वडगाव,शेळगाव, टाकळगाव वायगाव, वाढवणा बू,खू, बोरगाव बू. सह अनेक गावात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकते.यंदा सर्वञ बेसुमार पाऊस झाल्याने डोंगराळ व खडकाळ भाग सुध्दा हिरवाईने नटला आहे.आणि सर्वञ भुजलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. म्हणुन रब्बीत गहू,हरभरा,सुर्य फुल,ज्वारी यासह ऊसाच्या क्षेञात विक्रमी वाढ होण्याची चिन्हे आहेत..
यंदा भरपुर पाऊस झाल्याने आमची बरीच शेती अजुनही ओलीच आहे.तीचा वाफसा झाला की,मग हरभ-यासह अन्य पिकांची पेरणीसह ऊसाची ही लागवड करणार आहे.
बालाजी माने,शेतकरी,हंडरगुळी


0 टिप्पण्या