Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक मृदा दिवसनिसर्गाचा व मातीचा ऱ्हास न होऊ देता मातीचे संरक्षण करा- राजेश मुळजे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर  :-दिनांक 05/12/2025 रोजी वाढवणा मंडळातील मौजे हेर, वाढवणा, क्षेत्रफळ, नावंदी ता.उदगीर येथील गावात तालुका कृषी अधिकारी श्री संदीप वळकुंडे व मंडळ कृषी अधिकारी राजेश मूळजे यांच्या मार्गदर्शना खाली जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला, मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले, वाटप करून त्यावरून कोणत्या शेती निविष्ठा वापरावयाच्या याबाबत माहिती देण्यात आली व माती परीक्षण याबाबतचे महत्त्व सांगण्यात आले, तसेच महाविस्तार AI ॲप वापराबाबत सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांच्या फोन मध्ये एप्लिकेशन डाउनलोड करून घेण्यात आले, सोबत PocRa अंतर्गत शेती शाळा घेण्यात आली, तुर हरभरा या पिकाविषयी कीड व रोगांची विशेष करून मर रोग विषयी माहिती देण्यात आली व कृषी विभागाच्या विविध योजना सांगण्यात आल्या यावेळी उप कृषी अधिकारी श्री सुनील चव्हाण व सहाय्यक कृषी अधिकारी  श्री हनुमंत मेहेत्रे , संभाजी डवले, श्रीमती ससाणे, बोयणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या