चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपुर :-राज्याचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीन चीट मिळाली आहे. तर सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या निलंबनाच्या मागणीवर राज्यातील सरकारचा निर्णय झाला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत जाहीर केले आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडत असून, यावेळी भाजपा आमदाराने सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणीही केली होती. या प्रकरणात सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या निलंबनाच्या मागणीवर राज्यातील सरकारचा निर्णय झाला आहे. विधानसभेत स्पष्ट केले आहे.
नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडत असून, यावेळी भाजपा आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसंच त्यांना निलंबित करण्याची मागणीही केली होती. तुकाराम मुंढे कोविडच्या काळात नागपूर महानगरपालिकेत रुजू झाले. त्यामध्ये त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गैरप्रकार झाले असा आरोपही कृष्णा खोपडे यांनी केला होता. दरम्यान याप्रकरणी राज्य सरकारने सभागृहात माहिती दिली आहे. त्याना क्लीन चीट मिळाली आहे.
राज्यातील चर्चेत असलेले बीड जिल्हयातील सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना नागपुर स्मार्ट सिटी प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपातून ’क्लीन चीट’ मिळाली आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे व प्रवीण दटके यांनी स्मार्ट सिटी प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप केलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट मिळाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसमेत हे जाहीर केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले आहे की, राज्यातील एखादा आईएएस अधिकारी आरोपातून मुक्त झाला आहे.


0 टिप्पण्या