चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : नागपूर विभाग ग्रंथालय संघ, भंडारा जिल्हा ग्रंथालय संघ, व सुबोध सार्वजनिक वाचनालय दिघोरी मोठी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय अधिवेशन दिनांक-14 डिसेंबर 2025 रोज रविवारला स्थळ- जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक - संचालक भंडारा डिस्ट्रिक्ट सेंटर को-ऑपरेटिव बँक लिमिटेड भंडारा माननीय धर्मेंद्र बोरकर, यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ - डॉक्टर गजाननराव कोटेवार, नागपूर विभाग ग्रंथालय संघ शिव कुमार शर्मा, प्रमुख कार्यवाह नागपूर विभाग ग्रंथालय संघ - भाऊराव पत्रे, प्रदेश सचिव भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस - मनोज बागडे, कार्याध्यक्ष नागपूर विभाग ग्रंथालय संघ - अनिल बोरग म वा र, कार्यवाह नागपूर विभाग ग्रंथालय संघ नंदू बनसोड, अध्यक्ष भंडारा जिल्हा ग्रंथालय संघ - धनंजय दलाल, अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रंथालय संघ - प्रेम राज कुबडे, अध्यक्ष गडचिरोली जिल्हा ग्रंथालय संघ - जगदीश मस्के, जिल्हा ग्रंथालय अधिकारी भंडारा-खोमें द्र बोपचे, संस्थापक सुबोध सार्वजनिक वाचनालय - डॉक्टर रूपचंद्र निखाडे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक दिलीप चिमणकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी राजकुमार हटवार, शंकरराव लोहकरे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, कैलास समरीत, सागर लोंढे, मुकेश गजभिये, कंठीराम दंडारे, गुरुदास डोंगरे, चिंतामण राऊत, नरेंद्र चौरागडे, इत्यादी मोठ्या संख्येने ग्रंथालय कर्मचारी ग्रंथालय कार्यकर्ते गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.