मोहाडी येतील जी ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
चित्रा न्युज प्रतिनिधी
गोंदिया :-विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच जीवनमूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे आत्मविश्वास, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करू शकतो अपयश आले तरी खचुन न जाता त्यातुन बोध घेऊन पुढे जाणे हाच यशाचा मार्ग आहे शाळेच्या शैक्षणिक प्रगती सोबतच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आणि कलात्मक विकासाचा फायदा होतो यातुन विद्यार्थ्यांना केवळ प्रोत्साहनच मिळत नाही तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो त्यांच्यातील कला सादर करण्याची एक संधी मिळते स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे एक हक्काचे व्यासपीठ आहे असे प्रतिपादन मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी जी ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय च्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी केले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सरपंच बबंई सोमेश राहांगडाले तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डि आर चौरागडे,माजी सरपंच मदनलाल बघेले,माजी सरपंच धुर्वराज पटले,माजी उपसरपंच मोहनलाल पटले, श्रीराम पारधी, सामाजिक कार्यकर्ते कमलेश पटले,माजी सरपंच बाम्हणी डॉ गणेश राहांगडाले,सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, सेवानिवृत्त प्राचार्य एम वाय कुरेशी,सेवा सहकारी संस्था चे अध्यक्ष भाऊलाल चव्हाण, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, प्रभा पंधरे,सामाजिक कार्यकर्ते मोहन किशोर मौदेकर,शाळा समितीचे अध्यक्ष नरेश पटले, उपाध्यक्ष गोपाल उके शाळेचे प्राचार्य आर एस रहमतकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते
यावेळी विविध विद्यार्थीनी लेझिम,डान्स व विविध कलात्मक सामाजिक विषयांवर नाटक आदी कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर एस रहमतकर यांनी शाळेचे प्रगती अहवाल सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जे डी भेंडारकर तर आभार प्रा दिपक रामटेके यांनी केले यावेळी शालेय विद्यार्थी व पालक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 टिप्पण्या