Ticker

6/recent/ticker-posts

जि. प. उच्च प्राथमिक शाळा विजासन येथे नवरत्न स्पर्धा मोठया थाटात संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भद्रावती : -- येथील जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती भद्रावती द्वारा  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विजासन येथे नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा उत्साह पूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात आयोजन करण्यात आले. 
      आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगरपरिषद भद्रावतीचे नगराध्यक्ष  प्रफुल चटकी  होते तर अध्यक्षस्थानी  सुधीर सातपुते नगरसेवक नगर परिषद भद्रावती हे होते. 
    मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शोभा पारखी,  शिला कुळमेथे नगरसेवक , गजानन कामतवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,डॉ.प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती  कल्पना सिद्धमशेट्टीवार शिवीअ, स्वाती महाजन शिविअ,  सुरज उमाटे शिक्षण प्रेमी उपस्थित होते.
    सर्व पाहुण्यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक  डॉ.प्रकाश महाकाळकर  गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती यांनी केले तर संचालन माया विद्दे शिक्षिका यांनी केले. आभार प्रदर्शन  छाया खनके यांनी केले.
    समारोपीय कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जगन्नाथ दानव माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , संतोष कुरेकर ,योगेश गाडगे नगरसेवक नगर परिषद भद्रावती हे होते उद्घाटक म्हणून  आशुतोष सपकाळ संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती ,विशाखा शेळकी मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती ,  डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती होते. 
   समारोपीय कार्यक्रमाचे संचालन छाया खनके व आभार प्रदर्शन स्वाती महाजन शिविअ यांनी केले.
     नवरत्न स्पर्धा ही प्राथमिक आणि माध्यमिक गटांमध्ये घेण्यात आली त्यात कथाकथन स्पर्धा स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा वाढदिवस स्पर्धा एक पात्री भूमिका अभिनय स्पर्धा अशा एकूण नऊ स्पर्धा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या त्यात 216 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. नवरत्न स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. 
  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  डॉ.प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व गटसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक तसेच   मोरेश्वर विद्ये केंद्रप्रमुख, भद्रावती  सुरज उमाटे, विजासन , जि प शाळेच्या मुख्याध्यापिका  पेंदाम व सर्व शिक्षक  , व्यवस्थापन समिती जि. प.उ.प्रा. शाळा विजासन,परीक्षक म्हणून सरीता पिट्टलवार . नूतन वावरे , कविता पाझारे यांनी जबाबदारी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या