चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंडीपार :ग्राम मुंडीपार येथे मुंडीपार फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गोडाऊन बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी उत्साहात पार पडले. सदर भूमिपूजन कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी श्रीमती लालन राजपूत तसेच पंचायत समिती गोरेगांवचे माजी उपसभापती सुरेंद्रजी बिसेन यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी आत्मा विभाग, गोरेगाव येथील तंत्र अधिकारी गजानन पटले, मुंडीपार फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळाचे सदस्य, मार्गदर्शक तसेच परिसरातील स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंडीपार फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या