चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :-स्थित सायन किल्ल्याजवळील जोगळेकरवाडी म्युनिसिपल शाळा संकुल मधील सुप्रसिद्ध *ज्ञानविकास नाईट हायस्कुल, शीव (पुर्व)* मध्ये *'वर्ष २०२५ - २०२६'* दरम्यान शाळेय शिक्षण घेत असलेल्या *इयत्ता आठवी, नववी आणि दहावी* विद्यार्थ्यांचा
*'समारंभ हळदीकुंकूचा, जागर शिक्षणाचा'* हा सोहळा आदरणीय मुख्याध्यापक *बी. ए. परदेशी सर* यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
ह्या सोहळ्यामध्ये एबल एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा आणि समाजसेविका अनुराधा बिंगी मॅडम, त्यांची सुपुत्री अनन्या दिदी आणि त्यांचे जावई असे सहकुटुंबासोबतच, मासूम संस्थेच्या प्रोजेक्ट ऑफिसर प्रियंका जाधव मॅडम, गणिततज्ञ अजित केमनाईक सर, इंग्लिश विषयतज्ञ विनोद पाटोळे सर आणि स्टुडन्ट काऊंसलर जितेंद्र कांबळे गुरुजी इत्यादी मान्यवरांसह विद्यार्थी पालकांसह वर्ष २०२१ ते वर्ष २०२५ दरम्यान शाळेय शिक्षण पूर्ण करून चांगल्या श्रेणीत दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थी- विद्यार्थींनींची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच, नववर्षाच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी होत असलेल्या महिला विशेष हळदी कुंकू समारंभ स्वरूप जाणून परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने *'समारंभ हळदीकुंकूचा, जागर शिक्षणाचा'* हा सोहळा शैक्षणिक जागृतेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा ठरला ते विद्यार्थ्यांच्या पालकांसह परिचित नवीन शाळेय प्रवेश उमेदवारांचे आगमन.
ह्या सोहळ्यामध्ये विद्यार्थांनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळ आखून वयाचे बंधन न पाळता सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला.
शेवटी मान्यवर समाजसेविका अनुराधा बिंगी मॅडम यांनी सर्व आधुनिक काळात शिक्षण हे प्रत्येक स्त्रीचा अधिकारासह संरक्षण कवच असून शिक्षणातून निर्माण झालेली स्वतः ची ओळख हि कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त युगात शिक्षण हि काळाची गरज असल्याने प्रत्येकांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहिले तरच स्पर्धेच्या युगात तग धरू शकू, असे प्रोत्साहनपर मौलिक मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांच्या मायेपोटी स्वखर्चाने आणलेल्या आकर्षक भेटवस्तू वाटप केले तर विद्यार्थ्यांनी तिळगुळ वाटप करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि मासूम संस्थेकडून पौष्टिक अल्पोपहार वाटप करून हा सोहळा शैक्षणिक जनजागृतीसह हर्षभराने आनंदोत्सव महत्वाचा संदेश देणारा ठरला.


0 टिप्पण्या