चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:—शेतक-यांच्या मालकीची गुरे धुष्टपुष्ठ दिसेनात.परंतू पसाभर ही शेती नसलेल्या लोकांची गुरे माञ धुष्टपुष्ठ दिसतात.कारण ही सगळी गुरे मोकाट सोडलेली आहेत म्हणुन.आणि ही मोकाट जनावरे पिकांची नासाडी करत असल्याने शेतकरी मोकाट गुरांना हाकलून - हाकलून रडकुंडीला आले आहेत.आणि मोकाट गुरांना आवरा हो.असा टाहो हाळी हंडरगुळीतील शेतकरी फोडत आहेत.तरी ही या टाहोकडे ना हाळीची ग्रा.पं. लक्ष देते.ना हंडरगुळीची.या मुळे शेतकरीबांधव वैतागले असून प्रशासनाविरुध्द तीव्र संताप व्यक्त करत आहेत. अगोदरच खरीप हंगाम वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागलेल्या शेतकरीबांधवांनी रब्बीतील सर्वच पिकांची जीवतोडून व जीवधोक्यात घालून ही पिके जगवली,वाढवली.पण मोकाट गुरांनी पिकांमध्ये धुडगूस घालायला सुरवात केल्याने चांगली उगवलेली पिके नष्ट होत आहेत.म्हणुन पुन्हा एकदा शेतकरीबांधव आर्थिक व मानसिक टेंन्शन मध्ये आले असून मोकाट गुरांचा बंदोबस्त न करणारे ग्रा.पं.प्रशासन मोकाट गुरांच्या मोकाट मालकां कडून दाणा-पाणी तर घेत नाहीत ना?असा सवाल हाळी व हंडरगुळीतील ञस्त शेतकरीबांधवातुन चर्चीला जातोय.
हाळी व हंडरगुळीत अनेक कुटूंबांकडे पसाभरही शेती नाही.तरीही अशा अनेकांनी असंख्य मोकाट जनावरे पाळल्याचे आणि चरायला मोकाट सोडल्याचे दिसते.हे मोकाट शेळी,मेंढी,गाय,बैल म्हैस या जनावरांची टोळी पहाटेपासूनच अनेकांच्या शेतातील पिकांत घुसखोरी सह पिकांची नासाडी करत असतात.म्हणुन या मोकाट गुरांना मोकाट सोडू नका. अशी विनंती मोकाट गुरे असलेल्या मालकाला केली असता कांही मोकाट गुरांचे मोकाट असलेले मालक हे विनंती करणा-यांनाच अरे- तुरेची भाषा करत असतात. अशी कुजबूज ऐकू येते.तरी याबाबत प्रशासनाने त्वरीत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही


0 टिप्पण्या