Ticker

6/recent/ticker-posts

सुमठाणा येथीतील गुंडावार पेट्रोल पंप चौक येथे ट्राफिक पोलीसांची देण्याची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :  शहरा जवळील जुना सुमठाणा येथील गुंडावार पेट्रोल पंपा जवळील चौकामध्ये ट्राफिक   पोलीस देण्यात यावे अशी मागणी  भद्रावती पोलीस स्टेशन येथे एका निवेदना द्वारे केली आहे.

सदर जुना सुमठाणा येथे सेंटनिस शाळेत व जिजामाता स्कूलकडे जातांना गुंडावार पेट्रोल पंपच्या चौकातून  शाळेचे मुल शाळेत जातांना व शाळेतून येताना हॉयवे रोड वर मोठ्या  वाहनांची नेहमी सुसाट वेगाने  वाहतुकीची वरदळ चालू असतात व यापुर्वी अनेकदा या रस्त्यावर मोठे अपघात होवुन मृत्यू झालेले आहे.असे अपघात टाळण्या करीता आपल्या पोलीस खात्या कडून गुंडावार पेट्रोल पंप जवळील चौकात सकाळी ०८ ते ०९  व दुपारी ०३ ते ०४  वाजेपर्यंत वेळीच एक ट्राफिक पोलीस दिल्यास लहान मुलांचे अपघात टळुण जीव वाचविण्यास मोठी मदत होईल. अशा आश्याचे निवेदन भद्रावती पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे.

यावेळी निवेदन देतांना उपस्थित  निलेश देवईकर माजी नगरसेवक  तथा (नियोजन व बाधकाम सभपती), संतोष कोपावार, प्रमोद पारखी, रविभाऊ पाठक व मनोज क्रिष्णन आदी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या