Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशन तयारीसाठी माहूर येथे दुसरी आढावा बैठक!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
श्रीक्षेत्र माहूर- शेतकरी सध्या प्रचंड आर्थिक संकटात असून, शेतकरी कुटुंबातील वाढत्या आत्महत्या ही चिंतेची बाब बनली आहे. राज्यकर्त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणण्यासाठी 'शरद जोशी प्रणीत' शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन माहूरगड येथे  आयोजित करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक अधिवेशनाच्या जय्यत तयारीसाठी यापूर्वी २८ डिसेंबर २०२५ रोजी पहिली आढावा बैठक पार पडली होती. आता अधिवेशनाच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि कामाची गती वाढवण्यासाठी  पुन्हा एकदा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
 मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी  दुपारी १:०० वाजता,
  शहरातील जगदंबा धर्मशाळा, माहूर या मध्यवर्ती ठिकाणी
ही बैठक ललित दादा बहाळे व गुणवंत पाटील हंगरगेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. तयारीची ही अंतिम आढावा व नियोजन बैठक असल्याने या बैठकीसाठी  प्रमुख नेत्यांसह सर्व जिल्हा प्रमुखांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
          देशाच्या विविध राज्यातून प्रतिनिधी या अधिवेशनासाठी येणार असल्याने सर्वांगीण नियोजन  हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे राज्य शेतकरी संघटनेचे सर्व नेते, पदाधिकारी, महिला आणि युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे," असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 
          देशभर चाललेल्या शेतकरी संघर्षाचा घटक होऊन,
जाती-पाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन ,शेतकऱ्यांची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी हे अधिवेशन मैलाचा दगड ठरणार आहे.                                               सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेती आणि शेतकऱ्यांवरील अरिष्ट शेतकऱ्यांना देशोधडीला लावत असून, शेतकरी आत्महत्यांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. तोट्यात गेलेल्या शेतीला संरक्षण आणि उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव!भीक नको हवे घामाचे दाम! या मागण्या देशाच्या अजेंड्यावर पुन्हा आणून, सामाजिक आर्थिक न्यायासाठी लढ्याचे रणशिंग फुंकले जाणार आहे. माहूर चे राष्ट्रीय अधिवेशन देशातील शेतकऱ्यांना लढण्याची ऊर्जा देणारे ऐतिहासिक होण्यासाठी आढावा बैठकीत नियोजन करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या