चित्रा न्युज प्रतिनिधी
रामटेक : तालुक्यातील किरणापुर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती रविवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी नालंदा बुद्ध विहार किरणापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात - विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला तूफान रणरागिनी प्रबोधनाकाराची लाट बाल कीर्तनकार भाविका खंडारकर यांचा समाज प्रबोधन पर कीर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप कडबे, नालंदा बुद्ध विहार कमिटीचे संपूर्ण कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या