★१५ एप्रिलच्या आंदोलनाला सरपंच संघटनेचा पाठिंबा
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना' आक्रमक झाली असून, १५ एप्रिल रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला आता भंडारा जिल्हा सरपंच संघटनेने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली असून प्रशासनावरील दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
★प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय लोहबरे यांना दिलेल्या पत्रात सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद इटवले यांनी प्रशासकीय धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या शेतकरी वर्ग विविध संकटांचा सामना करत असून धान खरेदी, थकीत देयके आणि कर्जमाफी यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.प्रशासनाने आंदोलनादरम्यान सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात,जिल्हा सरपंच संघटनेने या आंदोलनाला समर्थन दिल्याने आता १५ एप्रिल रोजी होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
★शेतकरी आज आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडला आहे. त्यांच्या हक्कासाठी शेतकरी संघटनेने उचललेले पाऊल हे न्याय्य असून, ग्रामीण भागाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही या आंदोलनात खांद्याला खांदा लावून उभे आहोत.
-शरद इटवले, अध्यक्ष सरपंच संघटना


0 टिप्पण्या