Ticker

6/recent/ticker-posts

वेळापूर येथे पंचाचार्य जगद्गुरूंचा अड्डपालखी मिरवणुक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

चित्रा न्युज प्रतिनिधी
 सोलापूर:-लक्ष लक्ष नायनांनी पंचाचार्य जगद्गुरूंचा भव्य-दिव्य अड्डपालखी मिरवणुक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.१०८ शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा अमृत आणि सुवर्ण पट्टाभिषेक महोत्सवानिमित्त ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल चार दिवस सुरू आहे.
                रविवारी पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य-दिव्य अड्डपालखी मिरवणुक सोहळा पालखी मैदान ते श्री बृहन्मठ पर्यंत भव्य असा सोहळा निघाला.लेझीम महिलांचे ढोलीबाजा पथक विविध धार्मिक वाद्य कलश धारक महिला घोड्यावर सत्कारमूर्ती श्री गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज व श्री सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महाराज आरुड झाले होते.त्यानंतर श्री रंभापुरी जगद्गुरु,श्री उज्जैन जगद्गुरु, श्री शैल्य जगगुरु,श्री काशी जगदुरु, डॉक्टर मल्लिकार्जुनश्री काशी जगद्गुरु यांची अड्डपालखी तर सोहळ्यासाठी उपस्थित शिवाचार्य गण यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली तर नंतर रेणुकाचार्य यांचा सजवलेला रथ व अनेक भक्तगण मिरवणुकीत सहभागी झाले.या सोहळ्यासाठी हजारो भक्तगण गेले तीन दिवस उपस्थित आहेत.मिरवणुकीनंतर हिंदू वीरशैव लिंगायत समाज पंचाचार्य जगद्गुरू यांचे दिव्य सानिध्यात व अनेक शिवाचार्य यांच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
              सोमवारी मुख्य कार्यक्रम होणार आहे पंचाचार्य जगदुरूंच्या दिव्यसानिध्यात श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.१०८ शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना हरिद्रलेपन व अभ्यंग स्नान संपन्न होवून सकाळी १०.३० वाजता पंचाचार्य जगगुरु तसेच, उपस्थित शिवाचार्य, संत-महंत, शैक्षणिक,सामाजिक,राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न झाली आणि नंतर उपस्थितांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या