चित्रा न्युज प्रतिनीधी 
भंंडारा :-लाखणी तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाण्यांतर्गत एका गावातील गुम असल्याची नोंद करण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात  गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२४ मार्च २०२६ रोजी पालांदूर पोलीस ठाण्यात अप क्र. ७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणातील १६ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने तक्रार नोंदविण्यात आली होती.
दरम्यान, शोधाशोध केली असता दि.३० मार्च रोजी मुलगी मिळून आल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.या तपासणीत व पुढील चौकशीत आरोपीने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले असल्याने तसेच पीडितेच्या जबाबातूनही हे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता दि.३१ मार्च रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४,६४(२) (i) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत अतिरिक्त गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.प्रज्वल शिवणकर असे आरोपीचे नाव असुन याबाबत पुढील तपास साकोली येथील पोक्सो पथक प्रमुख स.पो.नी.सुनिता गावडे करीत आहेत.