चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-पळसगाव (खुर्द) येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध समाजाचे अध्यक्ष मा. दुर्वास खोब्रागडे होते.तर प्रमुख अतिथी प्रा. डॉ. शंकर बागडे होते. याप्रसंगी अतिथी म्हणून राजू रामटेके, दिनेश सोनटक्के, दामिनी मेश्राम, श्रीदेवी शेंडे,गौतम रामटेके, प्रकाश खोब्रागडे, अमर मेश्राम, अमर शेंडे, मिलिंद मेश्राम, अशोक मेश्राम, विश्वनाथ कोसे, डॉ. वसंत खोब्रागडे, मिथून रामटेके, हेमंत बारसागडे, संदीप गणवीर उपस्थित होते . यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पळसगाव (खुर्द) येथील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या एकूण १४ गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला.या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शिवण्या ठिकरे, काजल शेंडे, दिशान मोहुर्ले, बुद्धम रामटेके, दिव्या रंदये,सिद्धेश्वरी रंदये, तन्वी शेंडे यांना तसेच द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रसिद्धी शेंडे, अर्णव रंदये, पियांशू डाहारे,अवनी डाहारे, शौर्य खोब्रागडे, सोहम मोहुर्ले, स्मित शेंडे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि मान्यवर उपस्थित अतिथींच्या हस्ते पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे एकूण १४ गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रा. डॉ. शंकर बागडे यांच्याकडून ग्रंथ स्वरुपात पारितोषिके देण्यात आली. यावेळी नाट्य कला मंडळ पळसगाव (खुर्द) यांच्याकडून बौद्ध समाजास दोन मोठे फॅन आणि रमाई महिला मंडळास गोदरेज आलमारी सप्रेम भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद सुखदेवे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृष्णा शेंडे यांनी केले. याप्रसंगी पळसगाव (खुर्द) येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींची आणि बौद्ध उपासक,उपासिकांची बहुसंख्येनी उपस्थिती होती.


0 टिप्पण्या