Ticker

6/recent/ticker-posts

साकोली सेंदूरवाफा परिसरात शहरात दारूच्या बाटल्यांचा ढिग

साकोली सेंदूरवाफा व्हीएसएफ समुह  संतापजनक भूमिकेत


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली : शहरातील "आय लव्ह साकोली गार्डन" तलाव चौपाटी आणि आता शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थी जाण्याच्या मुख्य मार्गावरच असंख्य दारू बाटल्यांचा ढिग( शुक्र. ०८ मे ) ला निदर्शनास आला. याचे छायाचित्र व्हीआयपी ग्रुपने सोशल मिडीयातून टाकताच जनतेसह महिलाही संतप्त झाल्यात. अखेर ह्या इंग्रजी दारूच्या बाटल्या कुणाच्या आहेत व नेमके इथे कशा आल्यात याचा पोलीस विभाग व नगरपरिषदेने शोध घेऊन दंडात्मक कारवाई करा अशी मागणी व्हीएसएफ समुहाने केली आहे. साकोली सेंदूरवाफा शहरात विविध ठिकाणी दारूच्या बाटल्या आणून टाकणे ही नित्याचीच बाब झाली आहे. आता बिरसामुंडा चौक प्रभाग क्र. १ व २ मधून शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी कॉलेजचा मुख्य रस्ता जातो. येथे सकाळ संध्याकाळ महिला, विद्यार्थीनी व कॉलेजचे तरूण तरूणी शिक्षण घेण्यासाठी जातात. या रोडवरच शुक्रवारी सोलर पथदिवे खाली सुमारे ७० ते ८० इंग्रजी दारूच्या बाटल्यांचा ढिगार अज्ञात दारू दुकानाच्या माणसांनी आणून टाकला. हा संतप्त प्रकार व्हीआयपी ग्रुपचे अनिल कापगते यांनी पाहताच याचे फोटो काढून सामाजिक प्रसारमाध्यमांवर व्हायरल केले. यावर महिलांसह सामाजिक कार्यकर्ते संतप्त होत मुख्य रोडवर काल ( शनि. ०९ मे ) ला व्हीआयपी ग्रुप साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशनचे सदस्यगण एकत्र आले आणि ह्या दारूच्या बाटल्या येथे कुणी आणून टाकल्या यांचा नगरपरिषद व पोलीस विभागाने शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद करा अशी मागणी व्हीएसएफ समुहाचे अनिल कापगते, महेश पोगळे, अंकित कापगते, चंद्रशेखर कापगते, आशिष चेडगे, किशोर बावणे, दिगंबर सुर्यवंशी, विनायक बोरकर, राजेश मस्करे, रूपंचद कापगते, मुकेश पंचभाई, मनिष झिंगरे, संतोष आंबेडारे, कृष्णा हुकरे व अन्य जनता या घटनास्थळी एकत्र येत त्या दोषींवर संताप व्यक्त करीत याची त्वरीत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या