Ticker

6/recent/ticker-posts

समाज जागृती प्रतिष्ठान व सेवांकूर यांच्या संयुक्त विद्यमाने

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-सेवावसती मेंढा (भंडारा) परिसरातील भृशुंड मंदिर सभागृहात आजआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले .
डॉ . श्री . संजय मानकर यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी व रुग्णांचे समुपदेशन  केले .योग्य निदान करून रुग्णांना निःशुल्क औषधी वितरीत करण्यात आली .
डॉ. संजय मानकर सरांनी मातृ दिनानिमित्य सर्व मातांना शुभेच्छा दिल्या . तसेच उन्हाळ्यातील आजार , बालकांचे लसीकरण , किशोरी व महिलांमधील आजार , लहान कुटूंबाचे महत्व , फळे खातांना
घ्यावयाची काळजी , योगाभ्यास , फिजीओथेरपी , नॅचरोपॅथी , जनगणनेचे महत्व , हिवताप ' हत्तीरोग , प्राण्यांपासून होणारे आजार , उष्माघातापासून होणारे आजार , बचावात्मक उपाय , रेडक्रॉस दिवस (8 मे) , थॅलेसेमिया दिवसा बद्दल विस्तृत माहिती दिली .
श्री. स्वप्नील येवले यांनी औषधी वितरण केले . श्री . सागर उजवणे , श्री. रेवानाथ नेरकर यांनी औषधी व्यवस्था केली . सेवा वसती समितीचे वतीने श्री. शशिकांत हजारे यांनी सर्वांचे आभार मानले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या