चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा - जवाहरनगर परिसरात गुरुवार दिनांक २८ रोजी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा जवाहरनगर परिसरातील जुनी पिपरी, चिचोली,साहुली गावांना वादळाचा मोठा तडाखा बसला या तडाख्यात अनेकांच्या घरावरील छत लोखंडी पत्रे तसेच शेतामधील पत्र्यांच्या झोपड्या आणि शेतामधील सोलर पॅनल उडून गेल्याने अनेकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.जुनी पिपरी, चिचोली परिसरात वादळी वाऱ्याने घरांचे छत उडाले असून घरातील संसारपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. व त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. यामध्ये विजेचे खांब व विशाल वृक्ष
उन्मळून पडले व यामध्ये काही पाळीव प्राणी ही मृत्यमुखी पडले. या अचानक आलेल्या वादळांच्या संकटाने अनेकांचे संसार उध्वस्त केले असून यामध्ये फार मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानीचे नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे भंडारा विधानसभा अध्यक्ष नाशिक चवरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


0 टिप्पण्या