Ticker

6/recent/ticker-posts

अमरावतीत शहरात बिबट्याचे दर्शन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :- शहरातील गजबजलेल्या राहिवासी परिसर रामपुरी कॅम्प येथील रहिवासी मनपाचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या भावाच्या मालकीच्या गोदामामध्ये मंगळवारी (ता. २६) दुपारी बिबट शिरल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. ही माहिती वान्यासारखी पसरताच रामपुरी कॅम्पसह आसपासच्या परिसरातील
नागरिकांनी धाव घेतली, वनविभागाचे रेस्क्यू पथकसुद्धा पोहचले.रेस्क्यू पथकाने चार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला ताब्यात घेत पोहरा जंगलात सोडले. त्यानंतर
नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
महापौर तेजवानी यांचे भाऊ अनिल तेजवानी यांच्या
गोडाऊनमध्ये बिबट शिरला होता. चार तासानंतर त्याला
देशी दारुच्या दुकानातून जाळे टाकून रेस्क्यू करण्यात आले आणि जंगल परिसरात सोडून दिले. परंतु बिबट रामपुरी कॅम्पपर्यंत कसा आला, याबाबत कोणी काही सांगितले नाही.
शहराचे महापौर शिवचंद्र तेजवानी यांचे भाऊ अनिल तेजवानी यांचे प्रिन्स बारच्या मागे घर आहे आणि घरालगत गोदाम आहे.गोडाऊनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे
साहित्य व माल ठेवला आहे. या गोदामात दररोज मिनीट्रकमधून मालाची ने-आण केली जाते.. मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास अमोल गावनेर, रेस्क्यू पथक जवान. त्यांनी गोदाम उघडले आणि आतमध्ये गेले असता त्यांना गोदामामध्ये वर ठेवलेल्या साहित्यावर बिबट बसलेला दिसला. ते घाबरून बाहेर आले आणि गोदामाचे दार बंद केले. त्यांनी आसपासच्या नागरिकांना माहिती दिली. ही माहिती वान्यासारखी रामपुरी कॅम्पमध्ये पसरताच बिबट्याला पाहण्याकरिता हजारोच्या संखेने नागरिकांची गर्दी जमली. महापौर
श्रीचंद तेजवाणी, मनपा गटनेता चेतन गावंडे, मनपाचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंदे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, वन विभाग रेस्क्यू टीमचे वनपाल शाम देशमुख, फिरोज खान, अमोल
गावनेर, बाबुराव खेरकर, गजानन लादे, वनरक्षक अतुल धसकट, संदीप ठाकरे, कैलास इंगळे, धारपवार,
आकाश सारडा, गायकवाड, धोटे, वनमजूर मनोज ठाकूर, ओंकार भुरे, वाहन चालक संदीप चौधरी, अक्षय
चाबतकर सुशील तायडे, अशासकीय संस्थेचे शंतनू पाटील, संस्थेचे सुमित गवई आदींनी वन विभागाचे रेस्क्यू पथक दाखल झाले.रेस्क्यू पथकाच्या जवानांनी
अथक परिश्रम केले. बिबट गोडाऊनमधून उडी मारून बाहेर पडले. त्यावेळी नागरिक आरडाओरडा करीत गल्ली बोळीत पळत सुटले तर बिबट बाजुच्या बंद
असलेल्या देशी दारुच्या दुकानात शिरला. रेस्क्यू पथकाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि बिबट्याला पकडण्याकरिता देशी दारुच्या दुकानात जाळे टाकले. अखेर चार तासानंतर बिबट्याला
ताब्यात घेत जंगल अधिवासात सोडून देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या