Ticker

6/recent/ticker-posts

मराठी प्राध्यापक परिषदेची नवी कार्यकारणी अविरोध जाहीर


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ  आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली  अंतर्गत कार्यरत मराठी प्राध्यापक परिषदेची नवनियुक्त कार्यकारणी २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी अविरोध निवडून जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत अध्यक्षपदी तायवाडे कॉलेज कोराडी येथील डॉ. राजेंद्र वाटाणे, सचिवपदी सी.पी. अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय कुलकर्णी आणि कार्याध्यक्ष म्हणून गडचांदूर येथील डॉ. हेमचंद दुधगवळी यांची निवड करण्यात आली आहे.
मार्गदर्शक म्हणून डॉ. राजन जयस्वाल (नागभीड), डॉ. सत्यवान मेश्राम (नागपूर), डॉ. शरयू तायवाडे (कोराडी), डॉ. श्याम मोहरकर (चंद्रपूर) आणि प्रा. श्रीकांत नाकाडे (अर्जुनी मोरगाव) यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी डॉ. शैलेंद्र लेंडे (नागपूर), डॉ. धनराज खानोरकर (ब्रम्हपुरी), डॉ. नरेंद्र आरेकर (कुरखेडा), डॉ. संजय निंबेकर (लाखांदूर), डॉ. मनीषा नागपुरे, डॉ. संगीता खुरद, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. राकेश कभे आणि डॉ. हेमंत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी डॉ. सोपानदेव पिसे (नागपूर) सहकोषाध्यक्ष म्हणून डॉ. संजय लाटेलवार (राजुरा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहसचिवपदी डॉ. परमानंद बावनकुळे (पोंभुर्णा), डॉ. शरद मेश्राम (अर्जुनी मोरगाव), डॉ. राज मुसने (आष्टी), डॉ. अशोक भक्ते (मोहाड), डॉ. अरविंद कटरे (साकोली), डॉ. भूषण बंड (नागपूर), डॉ. विजय राऊत (नरखेड), डॉ. नरेंद्र घरत (नागपूर) आणि डॉ. विनोद भालेराव (मोहपा) यांची निवड झाली आहे. प्रकाशन प्रकल्पासाठी डॉ. प्रशांत सूर्यवंशी, विजय रैवतकर आणि डॉ. देवयानी चव्हाण यांची निवड करण्यात आली असून प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ. यशवंत घुमे (भद्रावती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहर जिल्हा प्रमुख म्हणून डॉ. संजय सिंगनजुडे, डॉ. प्रीती उमाठे आणि डॉ. राखी जाधव यांची निवड झाली आहे. नागपूर ग्रामीणसाठी डॉ. प्रमोद लेंडे (सावनेर) आणि डॉ. प्रवीण घारपुरे (देवग्राम) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा प्रमुखपदी डॉ. कविता राजाभोज, डॉ. रामलाल चौधरी आणि डॉ. जयश्री सातोकर, गोंदिया जिल्हा प्रमुखपदी डॉ. जगदीश भैसारे आणि डॉ. इंद्रकला बोपचे, गडचिरोली जिल्हा प्रमुखपदी डॉ. गणेश चुधरी, डॉ. प्रदीप चापले आणि डॉ. विलास खुणे, चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी डॉ. माधव कांडणगिरे, डॉ. जयश्री शास्त्री आणि डॉ. सुनंदा चरडे तसेच वर्धा जिल्हा प्रमुखपदी डॉ. सुधाकर भुयार आणि डॉ. प्रमोद नारायणे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. भूषण रामटेके (पुलगाव), डॉ. नरेंद्र मुरमाडे (चंद्रपूर), डॉ. प्रेमा चोपडे, डॉ. अमृता डोर्लीकर, डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. देवमन कामडी, डॉ. मंजुषा गभणे, डॉ. राजेश दिपटे, डॉ. अनिल बोपचे, डॉ. सुधीर मोरे, डॉ. प्रवीण काळे, डॉ. बंडू चौधरी, डॉ. निलीमा कापसे आणि डॉ. पराग सपाटे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून परिषदेच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. १९६८ पासून कार्यरत असलेल्या मराठी प्राध्यापक परिषदेने आजवर ३६ अधिवेशने यशस्वीरीत्या पार पाडली असून ‘अध्यापनाची विचारसूत्रे’ आणि ‘संवादिनी’ ही महत्त्वपूर्ण पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. परिषद मराठी प्राध्यापकांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व वैचारिक विकासासाठी विविध परिसंवाद, चर्चासत्रे आणि अधिवेशनांचे सातत्याने आयोजन करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या