Ticker

6/recent/ticker-posts

विनोद खोब्रागडे यांची नार्दोष मुक्तता

 मुख्य  न्यायदंडाधिकारी यांचे आदेश पारित


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रपूर यांनी विनोद खोब्रागडे यांना दिनांक २/५/२०२६ रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.
रामनगर पोलिस स्टेशन येथे दिनांक २३/६/२०२५ रोजी बोगस गुन्हा दाखल करुन, पोलिस प्रशासन यांनी बोगस चार्ज शिट दाखल केली होती.

अखेर न्यायमूर्ती प्रशांत प्र. कुलकर्णी मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रपूर यांनी सदर प्रकरणात विनोद खोब्रागडे यांना, दिनांक २/५/२०२६ रोजी आदेश पारित करून निर्दोष मुक्तता केली आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी सुद्धा वरोरा येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी  वरोरा यांनी विनोद खोब्रागडे यांना निर्दोष मुक्तता केले होते.

*काय होते नेमके प्रकरणं*

फिर्यादी विनोद खोब्रागडे यांचे सख्खे मावस भाऊ रामभाऊ उरकुडा रत्नपारखी उर्फ पारखी हे MSEB मध्ये नौकरी वर असताना १९९४ ला मरण पावले होते. त्यांच्या ठिकाणी पत्नी श्रीमती मालाबाई रामभाऊ रत्नपारखी उर्फ पारखी या अनुकंपावर नौकरी वर लागली होती.
सन २०२१ ला कोरोणा मध्ये ती मरण पावली, मुलबाळ कुणीही नाही असे असतानाही एक बादल खुशालराव उराडे यांनी बोगस बनावट खोटे विवाह नोंदणी प्रमाणपत्र बामनी ग्रामपंचायत येथे तयार करून कोर्टात वारसान प्रमाण पत्र मिळण्यासाठी केस दाखल केली होती.
विनोद खोब्रागडे यांना माहिती मिळताच बल्लारपूर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यास गंभीर तक्रार केली होती,मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.

अखेर कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बल्लारपूर यांचा न्यायालयाने बादल खुशालराव उराडे व ग्रामसेवक व लिपिक,बि .डी. ओ. व इतर यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश दिनांक ९/५/२०२५ रोजी दिले होते.
दिनांक १५/५/२०२५ रोजी आरोपी बादल खुशालराव उराडे व इतर विरुद्ध अनेक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
म्हणून सर्व आरोपी काही लोकांसोबत मिळुन कटकारस्थान करून, संगणमत करुन, खोटे बनावट शपथपत्र न्यायालयात दाखल करुन, खोटे आरोप बिनबुडाचे लावून बोगस गुन्हा दाखल करुन मनस्ताप दिला होता.
अखेर मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रपूर यांनी विनोद खोब्रागडे यांना दिनांक २/५/२०२६ रोजी आदेश पारित करून प्रकरणातुन निर्दोष मुक्तता केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या