Ticker

6/recent/ticker-posts

११२ वर चुकीचा काॅल केला म्हणुन वाढवणा पो.स्टे.मध्ये हाळी येथील ४ जणांवर गुन्हा दाखल झाला..!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 हंडरगुळी :-इर्मजन्सी काॅल म्हणुन ११२ हा नंबर जाहीर केलेल्या पोलिस खात्याला ११२ वर नेहमी वेगवेगळे काॅल येत असलेतरी ११२ वर आलेल्या माहीतीची संबंधित पोलिस तत्काळ दखल घेतात.आणि ११२ या नंबरवर काॅल करणा-या इसमाचे समाधान ही करत असतात.माञ,MDT ११२ वर केलेला काॅल दारुच्या धुंदीत आणि पोलिसांना मानसिक ञास देण्याच्या हेतूने केल्याचे सिद्ध झाले म्हणुन दि.१४ जुन रोजी हाळी येथील ४ जणांविरुद्ध पो.स्टे.वाढवणा येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. 
या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,दि.१४ रोजी दु.१५.२९ वा.सुमारास हाळी येथील ४ जणांनी MDT ११२ वर काॅल करुन काॅलरने त्याचे मोबाईल चोरी झाल्याची माहिती दिल्याने त्वरीत त्या ठिकाणावर पोउपनि.प्रवीण हालसे व सहकारी पोलिस तत्काळ गेले.
माञ,११२ वर खोटी तक्रार केलेले आरोपी क्र.१ गोडे विजयनंद गोपाळ,२- गोडे विश्वनाथ शिवाजी,३- गोडे माधव संजय ( रा.हाळी) व ४- बळते अंबादास गणपत रा.मुर्कीवाडी,ता.कमलनगर हे ४ आरोपी येनगेवाडी रोड वरील बाळू मोरतळे यांच्या धाब्यावर दारु पिऊन नशेत गडबड,गोंधळ करुन आपापसात झुंज करताना मिळून आले.व नशेत ११२ वर खोटी माहिती दिली.हे सिद्ध झालेवरुन पोलिस नायक गजानन पुल्लेवाड यांनी फिर्याद दिली.म्हणुन वरील ४ आरोपी विरुद्ध NC.१८७/२६ कलम. १९४(२),२१२,२१७ BNS व सह कलम ८५ (१) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून सपोनि.सुनील गायकवाड यांचे आदेशाने पुढील तपास शिवप्रताप रंगवाळ करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या