Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी येथे पंचायत समिती स्तरावर ‘कृषी दिन’ उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी(श.प्र.) : पंचायत समिती लाखनी यांच्या वतीने १ जुलै रोजी वसंतराव नाईक जयंतीनिमित्त ‘कृषी दिन’ कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.
                 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ.अस्विनी कान्हेकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी संदीप पानतावणे, तालुका कृषी अधिकारी नितीन राठोड,सहा. गटविकास अधिकारी कोसटीवार,कृषी अधिकारी व्ही.एस.चौधरी विस्तार अधिकारी, एम. जी.मेश्राम पं.स.लाखनी पं.स.लाखनी,विस्तार कृषी अधिकारी आय.एस. भांडारकर, विस्तार कृषी अधिकारी के.एन.चव्हाण,उपसभापती सुनील बांते पं.स.लाखनी, प्रगतशील शेतकरी सौ.अर्चना ढेंगे, श्री.शेषराव निखाडे, सौ.पौर्णिमा फुलेकर सरपंच रेंगोळा,श्री चंदुलाल राऊत 
श्री.सिद्धार्थ जांभुळकर, श्री.उत्तम मेंढे,सौ.उमादेवी निर्वाण तसेच कृषी विभागातील उप.कृषी अधिकारी जे.यु.नाकाडे, प्रशांत भोयर व कृषी सहायक उपस्थित होते.
                यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी नितीन राऊत यांनी सांगितले, “वसंतराव नाईक यांच्या विचारांवर चालून शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पंचायत समिती नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.”बदलत्या काळात शेती फायदेशीर करण्यासाठी असे उपक्रम दिशादर्शक ठरतील, अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला तालुक्यातील २०० हून अधिक शेतकरी, महिला बचत गट सदस्य, कृषी सहायक व विस्तार अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी (कृषी)  के.एन. चव्हाण यांनी केले तर आभार कृषी अधिकारी आय.एस. भांडारकर यांनी मानले.
               कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीक पद्धती, एकात्मिक कीड व्यवस्थापन, ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती व मृदा परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. सुधारित बियाणे, अवजारे व सेंद्रिय निविष्ठां,पीएम किसान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, फळबाग लागवड अनुदान व पीक विमा योजनांची माहिती देण्यात आली.यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना ‘कृषी भूषण’ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या