Ticker

6/recent/ticker-posts

आज नागपंचमीला साकोलीत सर्पमित्र होणार सन्मानित

"व्हीएसएफ" चे सलग दुसऱ्यांदा आयोजन : वनविभाग अधिकारींची असणार विशेष उपस्थिती 


चित्रा न्युज विषेश प्रतिनिधी 
साकोली : आपल्या जीवाची पर्वा न करता, एका फोनवर रात्री बेरात्री जनतेच्या घरी जाऊन शिरलेल्या सापांना सुरक्षित पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडणे व जनतेला विषारी दंश होण्यापासून वाचविणे हे निःशुल्क कार्य करणारे देवदूत म्हणजेच "सर्पमित्र" यांचा सत्कार सोहळा वनविभाग साकोलीचे अधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत आज ता. १७ ऑगस्ट दु. ४ वाजता वनविभाग कार्यालय, मोदी पेट्रोल पंप बाजूला साकोलीत होत आहे. विशेष म्हणजे हे नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन व्ही एस एफ युनिट समुहाचे दुसरे वर्ष आहे हे उल्लेखनीय. 
              पावसाळ्यासह सर्व ऋतू मध्ये जनतेच्या घरी, परीसरात कुठेही सरपटणारे प्राणी निघतात. यावर जनता सर्पमित्रांना फोन करतात. त्यावर सर्पमित्र स्वखर्चाने धावून येत अगदी सुरक्षित विषारी, बिन विषारी सापांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून नागरिकांचा जीव वाचविणारे अभिमानास्पद कामगिरी करणारे "सर्पमित्रांचा सन्मान २०२६" हा व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशनने मागील वर्षी पुढाकार घेतला. हे "व्ही एस एफ" चे दुसरे अभिनव आयोजन असून सर्पमित्र सत्कारमूर्तीत साकोली तालुक्यातील व शहरातील एकुण २० सर्पमित्रांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा वनविभाग साकोलीच्या निसर्गरम्य पटांगणात आज दुपारी ४ ला होत आहे. या अभिनव सोहळ्याला निमंत्रित गणमान्य निसर्गप्रेमी जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन "व्ही एस एफ युनिट" चे अनिल कापगते, आशिष चेडगे व किशोर बावणे यांकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या