कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत केलेल्या अकुशल कामे निरिक्षणादरम्यान भास्कर दाजीबा टीचकुले रा. पेंढरी  यांचे शेतातील मोहगनी वृक्ष लागवडीस भेट देऊन माहिती जाणून घेतली यावेळी जिल्हाधिकारी यांचे हस्ते रोपटे लावण्यात आले तर महोगनी विश्व अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण हेडाऊ व तालुका प्रतिनिधी वसंत तीतीरमारे यांचेकडून "बिग- लीफ महोगनी" हे पुस्तक जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यात आले . 
     महोगनी हे बहुउपयोगी वृक्ष असून बियांचा उपयोग कर्करोग , क्षय ,मलेरिया ,अंनेमिया ,मधुमेह यासारख्या आजाराच्या औषधामध्ये होतो तर लाकूड जहाज बांधणीसाठी वापरण्यात येते . याशिवाय हे वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेत असल्यामुळे पर्यावरण रक्षणास मदत होते . तसेच उष्ण व थंड प्रदेशात हे झाड जगते . १० ते १२ वर्षात भरघोस उत्पन्न मिळते . त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो . तालुक्यात मुख्य पीक धानाचे आहे पण निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती या प्रकारांणे धान उत्पादकांवर कर्जाचा डोंगर यावर मात करण्यासाठी शेतकरी महोगनी वृक्ष लागवडीकडे वळला आहे . भास्कर दाजीबा टिचकूले रां. पेंढरी यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत   महोगनी विश्व अग्रो प्रा. लि. चे सहकार्याने २ एकर जागेत महोगनी वृक्ष लागवड केली आहे . या प्लाटास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली . व समाधान व्यक्त केले. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी मनीषा दांडगे , उपविभागीय कृषी अधिकारी पद्ममाकर गिदमारे , सहाय्यक गटविकास अधिकारी आर. आर. डोंगरे मॅडम , तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर , जिल्हाधिकारी कार्यालयाचे आशिष डोनेकर, विपीन उर्हाडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राहुल गिऱ्हेपूंजे, तांत्रिक सहाय्यक राकेश दाते , महेश बर्वे , विनाश वालोदे , गिरिधर मेश्राम , महोगनी विश्व अग्रोचे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण हेडाऊ ,तालुका प्रतिनिधी वसंत तीतिरमारे यांचेसह प्रगतिशील शेतकरी स्थानिक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.