Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्याच्या विस्तारासाठी छत्रपती संभाजी राजे 24 रोजी येणार ...

लिंगोजी कदम :-ग्रामीण प्रतिनिधी नांदेड  संपर्क:-९६८९८२११३२                                                              
नांदेड :- स्वराज्य संकल्प अभियान गाव तिथे शाखा घर तिथे मावळा या अभियानांतर्गत हिमायतनगर तालुक्यातील करंजी जवळगाव सह आणि गावांना छत्रपती संभाजी राजे यांच्या भेटी होणार आहेत. स्वराज्य संघटनेचे स्वराज्य संकल्प अभियानाची माधवराव पाटील देवसरकर व सहकाऱ्यांनी भेटी दिल्या असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देवसरकर यांनी सांगितले. स्वराज्य संकल्प अभियानाचे छत्रपती संभाजी राजे २४ डिसेंबर रोजी करंजी जवळगाव वाघी विर्सनी टेंभुर्णी दिघी घारापूर पळसपुर डोलारी सिल्लोडा शिरपल्ली एकंबा कोटा जागीर सोनारी वडगाव आदी गावांना 18 डिसेंबर रोजी स्वराज्य संघटनेची माधव पाटील देवसरकर यांनी भेट दिली असून येणाऱ्या 24 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी करंजी येथे आले असता कार्यक्रमासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. राजे छत्रपती संभाजी राजेच्या भेटी आपल्या गावात येणार असल्यामुळे तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष 24 डिसेंबरकडे लागली आहे करंजी येथे सर्व युवक मंडळींच्या मार्गदर्शनाखाली उत्तम अशे  नियोजन चालू असल्याचे गावातील युवक मंडळींनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या