सरपंचासाठी १५२ तर सदस्यासाठी ८५६ उमेदवार होते रींगनात
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- नोव्हेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ५१ ग्रामपंचायतीमधील ५१ सरपंच आणि ४६४ ग्रामपंचायत सदस्य निवडीकरिता १८ डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली. त्यात सरपंचाकरिता १५२ आणि सदस्यकरिता ८५६ असे एकूण १००८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ७३ हजार १४४ मतदारांपैकी ५८ हजार ८७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार असल्याने उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मंगळवारी होणार आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली . ५१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून नोव्हेंबर २०२२ मध्ये ५१ ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने रविवार(ता १८) निवडणूक झाली. १६० प्रभागातून ५१ सरपंच आणि ४६४ ग्रामपंचायत सदस्यांची निवड होणार आहे . २३२ महिलांचा समावेश आहे.अनुसूचित जातीचे ८२ , अनुसूचित जमातीचे २१ , नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) ५८ आणि सर्वसाधारण गटातून २५२ सदस्य निवडून येणार आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती ४७ , जमाती १४ , नामाप्र ४१ , सर्वसाधारण १३० महिला सदस्यांचा समावेश आहे.
५१ सरपंचांपैकी अनुसूचित जाती ९ , अनुसूचित जमाती ४ ,नागरिकांचा मागास प्रवर्ग १३ ,सर्वसाधारण २५ असे आरक्षण निश्चित करण्यात आले असून अनुसूचित जाती ६ , जमाती १ , नामाप्र ६ , सर्वसाधारण १४ अश्या २७ ग्रामपंचायतीत महिला सरपंच राहणार आहेत. सरपंचाचे ५१ जागेकरिता १५२ आणि सदस्याच्या ४६४ जागेसाठी ८५६ असे एकूण १००८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस युती आणि भाजपा समर्थित पॅनल कडून निवडणुका लढविण्यात आल्या. काही ग्रामपंचायतीत दुहेरी तर काही ग्रामपंचायतीमध्ये बहुरंगी लढत झाली. रविवारी(ता.१८) रोजी निवडणूक पार पडल्याने सर्वच उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले. ७३ हजार १४४ मतदारांपैकी २९ हजार ६५२ पुरुष आणि २९ हजार २२५ महिला अशा एकूण ५८ हजार ८७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी(ता.२०) मतमोजणी असल्याने उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.


0 टिप्पण्या