Ticker

6/recent/ticker-posts

शहरातील मालगुजारी तलावास इकार्निया चा वेढा

नगरपंचायतीचे दुर्लक्ष
 
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी शहरातील मालगुजारी तलावाच्या पाण्याला इकार्निया(बनसिंगाळा) वनस्पतीने वेढल्याने तलावातील पाणी दूषित होण्याचे मार्गावर असल्याने मत्स्य पालन करणे,  गुरांना पाणी पिणे कठीण झाले आहे. यावर नगरपंचायतीकडून उपाययोजनांची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. 
      शहरात असलेल्या मालगुजारी तलावाचे नगरपंचायत प्रशासनाकडून सौंदर्यीकरण होत असले तरी या मालगुजारी तलावात मत्स्यपालनाचे काम केले जाते. मत्स्यपालनामुळे अनेकाना रोजगार प्राप्त होतो. या तलावातील पाण्यावर इकार्निया वनस्पतीने मोठ्या प्रमाणात वेढले असल्याने टाकलेल्या मासोळ्यांना पुरेसे अन्न तसेच प्राणवायू योग्य प्रमाणात मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मासोळ्यांची वाढ खुंटली आहे परिणामी मत्स्यपालन करणाऱ्या संस्थेचे  सुमारे दहा ते पंधरा लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. या वनस्पतीने संपूर्ण तलाव वेढल्याने गुरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. तसेच मागील वर्षी या वनस्पतीने तलाव वेढल्यामुळे एका स्थानिक नागरिकाचा मृतदेह शोध घेऊनही तब्बल २० ते २२ दिवस दिसून आला नाही. इकार्निया वनस्पतीमुळे तलावातील जलसाठा प्रदूषित होण्याचे मार्गावर असल्यामुळे लवकरात लवकर मालगुजारी तलावातून ही विषारी वनस्पती काढण्यात यावी. अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या