माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांची मागणी
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- लाखनी तालुक्यातील मुरमाडी/तूप आणि परिसरात जनतेला तालुका व जिल्ह्याचे ठिकाणी कामानिमित्त जायचे असल्यास सकाळी ११:०० वाजता नंतर बसफेरी उपलब्ध नसल्यामुळे जनतेला अवैध प्रवाशी वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागतो. प्रवाशांचे हिताचा विचार करून साकोली आगार व्यवस्थापकाने साकोली वरून दुपारी १२:०० वाजता सुटणारी साकोली ते पालांदूर मार्गे मुरमाडी/तूप बसफेरी सुरू करावी. अशी माझी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी मागणी केली आहे.
साकोली आगाराची भंडारा ते सानगडी मार्गे लाखनी मुरमाडी/तूप ही बसफेरी मागील अनेक दिवसापासून सुरू आहे. सदर फेरी सकाळी ११ वाजता भंडारा कडे गेल्यानंतर दिवसभर मुरमाडी/तूप परिसरातील जनतेला कामानिमित्त लाखनी व साकोली कडे जायचे असल्यास बस उपलब्ध नसल्यामुळे अवैध प्रवाशी वाहनांचा आश्रय घेऊन अधिक प्रवास भाडे देऊन तथा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. असे माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांचे म्हणणे आहे.
मुरमाडी/तूप परिसरातून दररोज अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तालुका व जिल्हा मुख्यालयी जाणे-येणे करतात. तसेच कार्यालयीन कामाकरीता अनेकांना यावे लागते. पण बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे तासंतास ताटकळत राहावे लागते. मुरमाडी/तूप परिसरातील प्रवाशांच्या सोयीचा विचार करून लवकरात लवकर साकोली ते पालांदूर मार्गे पिंपळगाव मुरमाडी/तूप बसफेरी सुरू करावी. अशी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी मागणी केली आहे.


0 टिप्पण्या