Ticker

6/recent/ticker-posts

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी तालुक्यातील दिघोरी/लहान येथील धम्मचक्र महाबोधी बुद्ध विहार, साईबाबा सार्वजनिक वाचनालय आणि ग्रामपंचायत दिघोरी चे संयुक्त विद्यमाने संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६६वे पुण्यस्मरणानिमित्त मंगळवारी(ता.६) सकाळी ९:०० वाजता अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भगीरथ भात गिरणी चे अध्यक्ष बी. डी. बोरकर, प्रमुख अतिथी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे संचालक शरद इटवले, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम हलमारे, बौद्ध समाजाचे अध्यक्ष रंजीत खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते कालिदास खोब्रागडे, किशोर हलमारे, भीमराव देशपांडे, भागवत हलमारे, डॉ.ए.बी. गणवीर, राधेश्याम निरगुळे, रमेश खोब्रागडे, ईश्वर मेश्राम, अध्यापक तुकाराम गोंडाने, रमेश निरगुळे, हरगोविंद खोब्रागडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख वक्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य तसेच त्यांनी शोषित पिडीत, महिला, कामगार व बहुजनांसाठी केलेल्या कामांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक बौद्ध समाजाचे सचिव परमानंद जांभूळकर तर आभार आशिष खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी दीपक खोब्रागडे, रोमन देशपांडे, संदीप खोब्रागडे, सौरभ खोब्रागडे, सुरेश मेश्राम, डेविड खोब्रागडे, सुनील घरडे, नानाजी खोब्रागडे, बोरराम नंदेश्वर, उपासिका उषा खोब्रागडे, जिजा घरडे, सुप्रिया बनसोड यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या