कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा:- धकाधकीच्या व व्यस्त जीवनात महिलांनी प्रती दिवस किमान अर्धा ते एक तास वेळ काढून व्यायामासह प्राणायाम केल्यास शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. असे प्रजासत्ताक दिनाचे पूर्व संध्येला ग्रामपंचायत दिघोरी चे वतीने आयोजित महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करतांना आरोग्य वर्धीनी उपकेंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. रुपाली पाखमोडे यांनी सांगितले.
            ग्रामपंचायत दिघोरी चे वतीने प्रजासत्ताक दिनाचे पूर्व संध्येला महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापिका देवगणा बोरकर, मुख्य मार्गदर्शक डॉ. रुपाली पाखमोडे, प्रमुख अतिथी उपसरपंच संध्या कुळमते, आरोग्य सेविका वंदना नैताम, सहाय्यक शिक्षिका ज्योती राऊत, ललिता तागडे, मीरा वंजारी, निता बोरकर, सामाजिक कार्यकर्त्या गायत्री इटवले यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून महिला मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी, महिलांना आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी. बाल संगोपन व पाल्यांच्या शैक्षणिक गरजेबाबद मार्गदर्शन करण्यात आले. महिला मेळाव्यात हळदी कुंकू व वान स्वरूप प्लास्टिक टोपली ग्रामपंचायतीचे वतीने महिलांना भेट देण्यात आल्या. महिला मेळाव्याचे प्रास्ताविक उपसरपंच संध्या कुळमते, संचालन अंगणवाडी सेविका लीलावती बडोले तर आभार ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी ग्रामपंचायत सदस्या संगीता शेंडे, नाजूक जांभूळकर, अंगणवाडी सेविका अर्चना हलमारे, मदतनीस रसिका कुळमते, शीला हलमारे, आशा कार्यकर्ती प्रभा कळपते आरोग्य मदतनीस ललिता बारसागडे यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यास गावातील बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.