कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी येथील पोलिस ठाण्यात ७४वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रध्वजाला सलामी/मानवंदना देण्यात आली. उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी व उपस्थितांना भारतीय संविधानाची उद्देशिका आणि तंबाखू मुक्त अभियानाची शपथ देण्यात आली. या वेळी पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी, संजय कोरचे, पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी, अमोल तांबे यांचेसह कार्यरत सर्व सहाय्यक फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नायक, शिपाई, गावातील गणमान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या