लाखनी पोलिस ठाण्याचे हद्दीतील घटना 

पिडीतेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू 
 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडारा :-लाखनी येथील पोलिस ठाण्याचे हद्दीतील एका गावात घराशेजारील एका १६ वर्षीय किशोर वयीन बालकाने ६ वर्षीय बालिकेस चॉकलेट चे आमिष दाखवून घरी बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी(ता.२४) सायंकाळचे सुमारास उघडकीस आली. वैद्यकिय अहवालावरून लाखनी पोलिसांनी विधी संघर्शित चुलत काकावर लैंगिक अत्याचार व पोस्को च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पिडीतेस उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे भर्ती करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
             पिडीत बालिका शहरातील एका नामांकित शाळेत इयत्ता पहिली ची विद्यार्थिनी आहे. मंगळवारी सकाळची शाळा असल्याने शाळा आटोपून घरी आली व दुपारचे सुमारास खेळत असताना घरा शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय चुलत काकाने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या योनी मार्गातून रक्तस्त्राव होत असल्याचे समजताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी शहरातील एका खासगी दवाखान्यात नेले. पण बंद असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात आणले. कर्तव्यावरील महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पिडीत बालिकेस तपासून लैंगिक अत्याचार झाल्याची पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी, पोलिस हवालदार सुभाष राठोड, पोलिस शिपाई विठ्ठल हेडे व महिला पोलिस मनीषा खेडीकर ह्या पथकाने ग्रामीण रुग्णालयात जाऊन पिडीतेस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सत्यता सगितली. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता या १६ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकांचे घर गाठून पसार होण्याचे तयारीत असलेल्या या बालकास ताब्यात घेतले. पिडीतेचे वडिलांच्या फिर्यादीवरून तथा वैद्यकिय अहवालावरून विधी संघर्शित बालकावर कलम ३७६(१), ३७६(एबी) भादवि तथा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे सहकलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीतेस उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा व त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे तपास करीत असून विधी संघर्शित बालकास बाल न्यायालयात पाठविण्यात आले आहे.