Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालक व शिक्षकांचा सहभाग आवश्यक

सरपंच वर्षा महावीर वंजारी यांचे प्रतिपादन 


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा:- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक व सांस्कृतिक विकासाकरिता शिक्षकांसह पालकांचीही प्रमुख जबाबदारी असल्याचे नवनियुक्त सरपंच वर्षा महावीर वंजारी यांनी जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा निलागोंदी येथे स्नेहसंमेलनानिमित्त उद्घटकीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सांगितले. 
           लाखनी व साकोली तालुक्याचे सीमेवर वसलेल्या वनव्याप्त दुर्गम गाव नीलागोंदी च्या जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेत २४ जानेवारी रोजी एक दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक नवनियुक्त सरपंच वर्षा महावीर वंजारी, अध्यक्ष स्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन बनसोड, प्रमुख अतिथी उपसरपंच महेश हटवार, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विकास भुरे, मुख्याध्यापक अशोक येळमे, सेवानिवृत्त वनपाल रमेश वंजारी, ग्रामपंचायत सदस्य छत्रपती हटवार, दिनेश वंजारी, ग्रामपंचायत सदस्या स्मिता बनसोड, प्रियती वरठे, सुषमा शेंडे, विद्या हटवार, सामाजिक कार्यकर्ता दिलहर बनसोड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व गावकऱ्यांचे प्रमुख उपस्थितीत एक दिवसीय स्नेहसंमेलन पार पडले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक येळमे यांनी तर संचालन व आभार सहाय्यक शिक्षक दादाराम वंजारी यांनी मानले. इयत्ता १ ते ४ चे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे माध्यमातून आपल्यातील सुप्त गुणांचे दर्शन गावकऱ्यांना दाखविले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या गीताने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या