संयोजन समितीला पैठण तालुक्यातून मिळतोय मोठा प्रतिसाद ...........
औरंगाबाद जिल्हा विशेष प्रतिनिधी गौतम सोनवणे
मो.8308128457,
पैठण -: सात ऑगस्ट रोजी विविध सामाजिक पक्ष संघटनेच्या वतीने पैठण बंदची हाक देण्यात आली असून या दरम्यान च विविध मागण्यासाठी महामोर्चा ही निघणार असून दहा ते पंधरा सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दि. २८/७/२०२३ शुक्रवार रोजी पार पडली असल्याची माहिती बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. मणिपूर हिंसेसह, निर्वस्त्र धिंड काढण्यात आल्याच्या निषेधार्थ व भाजप सरकारकडून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय मुस्लिम, लिंगायत, जैन, बुद्धिष्ट,ख्रिश्चन व धर्म परिवर्तीत अल्पसंख्यांक समुदायाच्या विरोधातील सामान नागरिक कायदा पारित करण्याच्या डावा विरोधात तसेच स्थानिक अतिक्रमण धारकांच्या नावे अतिक्रमित जागा करण्यात यावी, घरकुल निधी वाढविण्यात यावा या सह विविध मागण्यासाठी या राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने सात ऑगस्ट रोजी भारत बंदचे आव्हान करण्यात आले आहे. या भारत बंदच्या समर्थनात आरपीआय( A ) आरपीआय (आठवले गट,), शेकाप, वंचित बहुजन आघाडी, एकलव्य आदिवासी संघटना (शिवाजी ढवळे) बहुजन मुक्ती पार्टी व काही मुस्लिम संघटनांनी बहुजन क्रांती मोर्चा या नावाखाली एकत्र येत भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. सदरील बंद व महामोर्चा बाबत पैठण तालुक्यात जागृती व्हावी म्हणून ९ जिल्हा परिषद गटात तसेच अठरा गणातील प्रतेक गावात जाऊन प्रचार यंत्रणा राबवली जात असून हजारो महिला व पुरुषांचा या बंदच्या व महामोर्चात सहभाग नोंदविणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावेळी सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संयोजन समितीच्या वतीने गावागावात जाऊन प्रचार राबवत आहे. या संयोजन समितीला तालुक्यातुन खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील एस. सी. एसटी. ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक एकत्र येऊन शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात बंद व महामोर्चा काढत आहेत. या मुळे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले असुन तालुक्यातील सामाजिक, राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे.


0 टिप्पण्या