प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9734486558
तिरोडा - महाराष्ट्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने तिरोडा तालुक्यातील देखील सदस्यता नोंदणी व पक्ष प्रवेश कार्यक्रमाला सुरुवात केली असुन तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सदस्य होत आहेत अशी माहिती माजी आमदार चरण वाघमारे यांनी शासकीय विश्रामगृह तिरोडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या भारत राष्ट्र समिती पक्षाने महाराष्ट्र मध्ये विस्तार का करीत आहेत यावर वाघमारे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते. राजकीय परिस्थिती बघून भारत राष्ट्र समिती ताकदीने महाराष्ट्रात उतरली आहे. बहुजन समाजासाठी तेलंगणामध्ये सुरु करण्यात आलेल्या योजना तेथील सोयीसुविधा याची माहिती चंद्रशेखरराव हे सभांमधून देत आहेत. त्यांच्या संघर्षमयी वाटचालीची भुरळ पडून अनेकजण चंद्रशेखरराव यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना याचा फायदा होऊ शकतो की नाही याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
पक्षाची वाटचाल महाराष्ट्रच्या सीमावर्ती भागात गंगापूर खुलताबाद विधानसभा तसेच महाराष्ट्रामध्ये दमदार एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. गंगापूर खुलताबाद मतदारसंघात भारत राष्ट्र समिती या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने प्रवेश होत. आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकीत बीआरएस चमकदार कामगिरी करणार असल्याचे सांगितले.
आपला पक्ष महाराष्ट्रात तेलंगणा मॉडल आणन्याची घोषणा वाघमारे करीत आहेत. वाघमारे यांनी ग्रामीण स्तर, तालुका, पंचायत समीती, जिला परिषद ते महाराष्ट्र विधानसभा पर्यंत राजकीय प्रवास केला आहे .सर्वप्रथम अपक्ष, शिवसेना, भाजपा ते आता BRS भारतीय किसान समीती मधे प्रवेश करून किसान सेवेत रूजु झाले आहे, त्यांचे सोबत बाळू भगत, भुपेंद्र सिंह बैस, जगने बाबु व अन्य कार्यकर्ता परिश्रम करीत आहेत, गोंदिया जिला मध्ये चार विधानसभेच्या जागा आणन्याची तयार करित आहे तसेच सदस्य नोंदनी कार्यक्रम सुद्धा चालु करण्यात आलेला आहे, त्यांनी तुमसर व मोहाडी क्षेत्रात 52000 सदस्य तयार केले आहे, ही फारच मोठी बाब आहे, आता पण सदस्य अभियान चालु आहे.


0 टिप्पण्या