💐 || सुमंगल सुप्रभात || 💐
🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - २ ऑगष्ट
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. ११ श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
मास : अधिक श्रावण
पक्ष : कृष्ण
तिथी : .प्रतिपदा (२०.००) ~ द्वितीया
वार : बुधवार
नक्षत्र : श्रवण (१२.५०) ~ धनिष्ठा
राशी : मकर (२३.२०) ~ कुंभ
१६७७: शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
१७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.
१८७०: जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवेची लंडन मध्ये सुरवात झाली.
१९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष बनले. हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.
१९५४: दादरा व नगर हवेली हा भाग भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
१९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्यामुळे खाडी युद्ध सुरु झाले.
१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला.
२००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.
जन्मदिवस
१८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ या कंपनीचे संस्थापक. १८९६ मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत.
१८७६: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या
१८९२: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक जॅक एल. वॉर्नर
१९१०: कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे
१९१८: आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा जे. पी. वासवानी.
१९२९: भारतीय राजकारणी विद्याचरण शुक्ला.
१९५६: गुजरात राज्याचे राजकारणी व पूर्व मुख्यमंत्री विजय रूपाणी
मृत्यूदिन
१९२२ : अलेक्झांडर ग्रॅहम बेल, टेलिफोन संशोधक
१७८१: सखाराम बापू बोकिल, पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे
*।। दास-वाणी ।।*
प्रत्ययास बोलिजे न्याये ।
अप्रत्यये तो अन्याये ।
जात्यांधास परीक्षा काये ।
नाना रत्नांची ।।
म्हणोन ज्ञाता धन्य धन्य ।
जो निर्गुणेंसी अनन्य ।
आत्मनिवेदनें मान्य ।
परम पुरूष ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १३/०६/३०-३१
प्रत्यय म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. अनुभूतीचे बोल हे न्याय्य असतात. अप्रत्यय म्हणजे अनुमानाचे अंदाजपंचे बोल. हे निव्वळ शाब्दिक ज्ञान अनुभवाचा आधार नसल्यामुळे पोकळ आणि पोचट असते. जन्मत: आंधळया माणसाला रत्नांची पारख जशी होणे शक्य नाही, त्याच प्रमाणे पारमार्थिक अज्ञानी अंधाला ब्रह्मानुभव येण्याची शक्यताच नाही.
ज्ञाता म्हणजे ज्ञानचक्षूनी परब्रह्माची अनुभूती घेतलेला योगी पुरूष खरोखरच धन्य होय. निर्गुणाशी अनन्य झाल्यामुळे तो परब्रह्मात आत्मनिवेदन करतो. जीवशिवाचे ऐक्य साधल्यानंतर तो परमोच्च पदी आरूढ होतो. सामान्य भक्तांसाठी तो उत्तमपुरूष म्हणून मार्गदर्शक ठरतो.
लघुबोधनिरूपण समास.
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या