मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद :- दि 06/08/2023 वार रविवारी सकाळी ठिक 09.30 वाजता,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने बौद्धांच्या विश्वात पवित्र आणि क्रांतिकारी असलेल्या वर्षावासा निमित्त सामूहिक बुद्ध वंदना आणि प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तरी यावेळी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेचयावेळी अ ) भारतीय संविधानाची अंमलबजावणी का होत नाही ? आणि ब ) तथागत बुद्धांचा कर्म सिद्धांत, या विषयावर जि. संघटक मा. विजय अशोक बनसोडे आणि समता सैनिक दल ता. सचिव
मा. सचिन राजेंद्र दिलपाक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी ता अध्यक्ष,बाबासाहेब बनसोडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.तर प. सचिव,धनंजय वाघमारे,वाघमारे सिद्राम (मेजर),रोहित गायकवाड, शीलरत्न ओहाळ.भैय्या लोखंडे, सागर बनसोडे यांच्या सह अनेक विद्यार्थीगण उपस्थित होता.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी मिठाई वाटप करण्यात आली आणि ता.सरचिटणीस,उमाजी गायकवाड उपस्थिततांचे आभार मानले ,


0 टिप्पण्या