Ticker

6/recent/ticker-posts

रक्तदान व मॅरेथॉन स्पर्धेने जागतिकआदिवासी दीन थाटात साजरा


प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9734486558
गोंदिया -
  देवरी -आदिवासी समाजाचे सांस्कृतीक वेगळेपण मानवतेबददल असिम श्रध्दा,निसर्गावर अतुलनिय प्रेम प्रामाणिकपणाचा अत्युच्च कळस या पारंपारीक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर ९ ऑगस्ट हा दिवस जाग तिक आदिवासी दिन म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो, ९ आगॅस्ट जागतिक आदिवासी दिन हा दिवस भारतातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे, या निमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी तसेच सर्व आदिवासी सामाजिक संघटना ता. देवरी जि.गोंदिया च्या वतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे व रक्तदान शिबीराचे आयोजन करुन ९ ऑगस्ट हा दिवस जाग तिक आदिवासी दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
 कार्यक्रमाची सुरवात सकाळी ६.०० वाजाता सहसरामजी कोरोटे (आमदार,आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र) यांचे हस्ते राणी दुर्गावती व प्रकल्प कार्यालयातील क्रातीसुर्य विर बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
     सोबत विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी, . अशोकजी बनकर अपर पोलीस अधिक्षक, गावळ नायब तहसिलदार,संजुजी उईके नगराध्यक्ष,नगर पंचायत अंबीकाताई बंजार सभापती,प.स, कौशल्याताई कुंभरे,.नगरसेविका, तुळशिराम सलामे अध्यक्ष, गोंडवाना सेवा समिती, देवरी, चेतनजी उईके अध्यक्ष, आदिवासाी कर्मचारी, संघटना देवरी, भरत मडावी गोंडसमाज जिल्हा अध्यक्ष, मा.श्री.दुर्गाप्रसाद ककोडे अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉईज फेडरेशल संघटना देवरी, आदिवासी हलबा/हलबी कर्मचारी महासंघ, देवरी, महाराणी दुर्गावती महिला समिती देवरी, यासह मोठयाप्रमणात प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी, शासकीय आदिवासी मुला/मुलींचे वसतीगृहातील मुले/मली तसेच देवरी तालुक्यातील मोठयाप्रामणात आदिवासी बांधव उपस्थित होते.
      सकाळी ०७ वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात होण्यापुर्वी सर्व मान्यावर,स्पर्धकाच्या उपस्थिती राज्यगीत ने सुरवात करुन गोंडी भाषेतून सविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन पंचप्रण ची शपथ घेण्यात आली व त्यांनतर अध्यक्ष तथा प्रमुख पाहुणे यांचे हस्ते हिरवी झेंडे दाखवून मॅरेथॉन स्पधेला मोठया उत्साहात स्पर्धेला सुरवात करण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेत जवळ पास पाचशे स्पर्धेत धावले .सदर मॅरेथॉन स्पर्धेतील पुढील प्रमाणे विजेते स्पर्धक १. शालेय गट मुले मध्ये प्रणय ज्ञानेश्वर माहुले प्रथम कुणाल निलकंठ वाघ दुतीय समित रविंद टोग तृतीय तर महिला मध्ये कु.मिताली दिपक भोरय प्रथम,चैताली विजय बोरेकर कु.आस्था हेमंत निंबार्ते शालेय गटात विजेते झाले.
२.महाविद्यालयीन गट मध्ये मुले शादाब अयुग पठाण प्रथम,सरजित रामा राजभर,राजन विक्रमजित यादव तर मुलीमध्ये कु.तेजस्विनी परेंद्र लांबकाने, कु.गीतल संजय सोनेकर विजेते ठरले
३. पौढ गट मध्ये सौरभ अशोक तिवारी, लिलाराम इस्तारु बावणे, गौरव गजानन खोडतकर मुलामध्ये विजेत तर मुलीमध्ये कु. रिया राजेश दोहतरे कु.अर्थिका ताराचंद तुमसरे कु.वर्षा महेंद्र खुळसुंगे पौंढ गटात स्पर्धेक ठरले. शालेय गट, महिद्यालयीन गट, व पौढ या तीन्हीही गटातील महिला व पुरुष अशा दोन्ही गटातील प्रथम, दुत्तीय व तृतीय विजेते स्पर्धेकांना सन्माननिय अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे उपस्थित त्यांचे हस्ते रोख रुपये प्रथम सात हजार, दुत्तीय, पाच हजार, व तृतीय तीन हजार व सन्माचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर . आदिवासी गोंडवाना सास्कृतीक सभागृह येथे मा.आ.संजय पुराम यांचे उपस्थितीत रक्तदान सिबीर आयोजित करण्यात आले. या वर्षी ६० बांधवानी रक्तदान करुन जागतिक आदिवासी दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
     सदर दोन्ही कार्यक्रमासाठी नियोजबध्द व सुरळीत पार पाडण्यासाठी आश्रमशाळेतील क्रिड्रा शिक्षक प्रकल्प कार्यालयातील श्री.अरुण सुर्यवंशी स.प्र.अ. विजय मेश्राम स.प्र.अ. तसेच, श्री. विनोद गायकवाड,श्री ए.टी भुसारी, श्री. शिरीष सोनेवाने, श्री.एस.जी तोरकड श्री दिनेश कुंभारे, श्री.तारा मडावी तसेच आश्रमशाळेतील क्रिड्रा शिक्षक यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री दिपेश मांडे सर यांनी केले. व देवरी तालुक्यातील सर्व आदिवासी सामाजिक संघटना च्या सहकार्याने सदर कार्यकम सुरळीत पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या