• साकोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
• शिक्षकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा:- पोलिस ठाणे साकोली चे हद्दीतील एका गावच्या जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता ४थी मध्ये शिकणाऱ्या ९ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी मनोविकृत नराधम शिक्षकाने अश्लील चाळे केल्याची घटना गुरुवारी(ता.३) सायंकाळी ४:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पिडीत बालिकेच्या आई चे फिर्यादी वरून साकोली पोलिसांनी शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा(पोक्सो) चे विविध कलामानव्ये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपी वासनांध शिक्षकाचे नाव देवराम लक्ष्मण पटले(५६) रा. परसोडी/केसलवाडा, तालुका लाखनी असे आहे. या घटनेमुळे पालक वर्गात असंतोषासह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंचायत समिती साकोली चे अधीनास्त एका गावात जिल्हा परिषदेची कनिष्ठ प्राथमिक शाळा असून इयत्ता १ ते ४ मध्ये शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये १२ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. ९ वर्षीय पिडीत बालिका याच शाळेत इयत्ता ४थी मध्ये शिक्षण घेत आहे. तर नराधम शिक्षकही याच शाळेत कार्यरत आहे. महिनाभरापूर्वी याच विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाने पिडीत बालिकेस गणवेशाचे माप देण्याचे बाहण्याने कार्यालयात बोलावून गाल, कपाळ व ओठाचे चुंबन घेऊन जवळ बोलावून गुप्तांगात बोट घातले होते. पण शिक्षकाचे भीतीने पिडीत बालिकेने या बाबद घरी वाच्यता केली नाही. त्यामुळे मनोविकृत शिक्षक देवराम पटले याची हिम्मत वाढली. तथा गुरुवारी(ता.३) सायंकाळी ४:०० वाजताच्या सुमारास अल्पवयीन पिडीत बालिका इतर विद्यार्थ्यांसह रस्सीखेच हा खेळ खेळताना विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाने तिचे मागे उभा राहून पीडितेची छाती दाबली. शाळेला सुट्टी झाल्यावर पिडीत बालिका घरी गेल्यावर झालेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता कुटुंबीयांनी साकोली पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक थोरात यांना आपबिती सांगितली. पिडीत बालिकेच्या आई चे फिर्यादी वरून साकोली पोलिसांनी अपराध क्रमांक ४११/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला. कलम ३७६(२), ३७६(अब) भादवि तथा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सहकलम ४, ६, ८, १० अन्वये शिक्षक देवराम पटले यांचेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खोकले करीत असून या घटनेमुळे पालक वर्गात संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.


0 टिप्पण्या