रविकांत बोपचे यांच्या हस्ते अल्पोहार वितरण..!
प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558
गोंदिया -तिरोडा आज तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील राणी अवंतीबाई लोधी यांच्या स्मारक जवळ जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित अल्पोहार वितरण कार्यक्रम युवा नेते रविकांत बोपचे यांच्या हस्ते संपन्न झाले.
दरवर्षी तालुक्यातील विविध आदिवासी संघटना व समाज बांधवांकडून जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने तालुक्यातील खेडी व शहरात आदिवासी समाजातर्फे भव्य रॅली चे आयोजन केले जाते. याप्रसंगी आदिवासी समाज बांधव विविध कला संस्कृती चे प्रदर्शन करीत असतात. अश्याच तर्हेने आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघालेल्या रॅली चे तिरोडा राष्ट्रवादी च्या वतीने मा. रविकांत बोपचे, मा. डॉ. अविनाश जयस्वाल, जि. प. सदस्य श्री किरण पारधी, जि. प. सदस्य श्री जगदीश बावनथडे, प. स. सदस्य जितेंद्र चौधरी, सरपंच श्री राजकुमार ठाकरे, संचालक श्री रामसागर धावडे, सौ जयाताई धावडे व पक्षाच्या विविध पदाधिकारी तर्फे अभिवादन करून शुभेच्छा देत अल्पोहार वितरित करण्यात आले.
याप्रसंगी सर्वश्री रविकांत बोपचे, मा. डॉ. अविनाश जयस्वाल, जि. प. सदस्य श्री किरण पारधी, जि. प. सदस्य श्री जगदीश बावनथडे, प. स. सदस्य श्री जितेंद्र चौधरी, सरपंच श्री राजकुमार ठाकरे, श्री शामराव जी उईके, संचालक श्री रामसागर धावडे, तालुका महिला अध्यक्ष सौ जयाताई धावडे, संजय रहांगडाले, श्री मुन्नालाल बिंझाडे, भवानीसिंह बैस, आशु पटले, राजेश ठाकूर, शामराव ठाकूर, सरपंच रविकुमार भगत, विठ्ठल बांते, उमेश अंबुले, अश्विन कोटांगले, राजेंद्र रहांगडाले आदींसह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या