कार्यकर्त्यांनो, तुम्ही भाग्यवान आहात ; तुम्हाला गुलाबरावांसारखे नेतृत्व लाभले
जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे यांचे गौराद्गार
चित्रा न्युज प्रतिनिधी
जळगांव :- जनतेचे पाठबळ हीच खरी उर्जा असून या माध्यमातून अजून जनसेवा करण्याचे बळ मिळत असते त्यासाठी संपर्क हीच राजकारणातील सर्वात मोठी ताकद आहे. धरणगाव व जळगाव तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ३२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक व युवासैनिकांनी सज्ज राहावे. जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून नवीन कार्यकर्त्यांचा मान राखून एकजुटीने पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील रहा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हीच आपली खरी ताकद असून शिवसेना हीच आपली भावकी असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले आहे. तर जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहून ना. गुलाबराव पाटील यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासून सज्ज राहावे. जिल्हावासीयांना गुलाबराव पाटलांसारखे खंबीर नेतृत्व लाभल्याने कार्यकर्त्यांनो तुम्ही भाग्यवान आहात, अश्या शब्दात जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे यांनी गौराद्गार काढले. जळगाव शहर व जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे हे होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख मनोज हिरवे हे समता जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्या निमित्ताने त्यांचा सत्कार शिवसेना नेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आला.*
बैठकीप्रसंगी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या हृदयात असून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच कार्यकर्त्यांच्या निवडणुका येत असून यात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. ६ नोहेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याकरिता शिवसैनिक व युवासैनिकांनी सज्ज राहावे. पक्ष संघटनेला महत्त्व देऊन सर्वांनी एकदिलाने काम करावे. महिलांचा प्रभाव या ग्रामपंचायतीवर दिसणार असल्याने कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या महिलांना निवडणुकीत उभे करावे. सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घ्यावी अश्या सूचनाही ना. गुलाबराव पाटील यांनी केल्या.
*पक्षाची ध्येय - धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवा - जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे*
कार्यकर्त्यांची एकजूट महत्वाची आहे तसेच तालुक्यातील गाव - गाव आणि घर - घर शिवसैनिक नोंदणी करून शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्याचे काम करण्याचे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे यांनी केले.
*यांची होती प्रमुख उपस्थिती.*
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर यांनी तालुक्यातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील ३२ ग्रा पं तीचे निवडणूक बाबत तसेच शिवसेना बांधणी बाबत सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांनी केले तर तर आभार धरणगाव तालुका प्रमुख डी.ओ. पाटील यांनी मानले.
व्यासपीठावर महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, शहर संघटक दिलीप पोकळे , उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, पी. एम. पाटील सर , मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख तथा पं. स. सभापती मुकुंद नन्नवरे , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, श्याम कोगटा जळगाव व धरणगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील, डी.ओ. पाटील, जिल्हा परिषद सदस्य पावन सोनवणे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन ,विकास धनगर विकास पाटील, दुध संघाचे रमेश पाटील गटनेते पप्पू भावे , पी.के. पाटील, युवासेनेचे तालुका प्रमुख अजय महाजन, रामकृष्णा काटोले, विश्वनाथ माळी, दीपक भदाणे, स्वप्नील परदेशी, राजेंद्र चव्हाण, भानुदास विसावे, माजी सभापती. नंदलाल पाटील, जणाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, तुषार महाजन, वासुदेव चौधरी, साहेबराव वराडे, सुरेश गोलांडे, गजानन जगदाळे, वैद्यकीय सेनेचे जितु गवळी, अर्जुन पाटील महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शोभा चौधरी, ज्योतीताई शिवदे, प्रिया इंगळे, गिरीश सपकाळे, आशुतोष पाटील, चेतन संकत अजय देशमुख, हर्शल मावळे, शंतनू नारखेडे, हितेश ठाकरे, देविदास कोळी, संजय घुगे, गोविंदा पवार, शीतल चिंचोरे, रेखा पाटील, सुनीता पाटील, पुष्पा पाटील, मोतीआप्पा पाटील, जितु पाटील, यांच्यासह जळगाव शहर व जळगाव ग्रामीण मतदार संघातैल शिवसेना , युवसेना व महिला आघाडीच्या पदधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या