मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मौजे अणदूर येथील स्वर्गीय मंदाकिनी बालाजी घुगे या ७६ टक्के अपंग महिलेने व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याला घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी सहा ते सात वर्षापासून शासन - प्रशासन दरबारी हेलपाटे मारून पाठपुरावा करत असताना कांही प्रस्थापित राजकारणी मंडळींनी त्यांना जाणून बुजून घरकुल मिळू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करून अपंग महिलेची वेळोवेळी क्रूर चेष्टा करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना घरकुला पासून वंचित ठेवण्याचे व त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम केले. स्वतःला जनसेवक, जनप्रतिनिधी संबोधणारे तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व सरपंच वेळोवेळी अन्याय केला. या विरोधात अपंग महिला व त्यांच्या कुटुंबातील लहान मुले व पत्नी यांना तब्बल १४ दिवस उपोषण करावे लागले तरीसुद्धा गेंड्याची कातडी पांघरलेल्या अणदूर ग्रामपंचायतीच्या लोकांना कांही फरक पडला नाही. १४ दिवसाचे बेमुदत उपोषण केल्यानंतर धाराशिव जिल्हाधिकारी मा.सचिन ओंबासे साहेब यांनी दखल घेऊन त्याचा पाठपुरावा केला. संबधित अपंग महिला या योजनेस पात्र असल्याची खात्री करून मा. जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने निर्णय घेऊन घरकुल मंजूर केले परंतु दुर्दैवाने मंजूर योजनेचा हप्ता मिळण्याच्या आतच अपंग महिला मंदाकिनी बालाजी घुगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोलापूर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे पती वारसा आधारे घरकुल मिळावे यासाठी अणदूरचे प्रथम नागरिक सरपंच रामचंद्र अलुरे यांच्याकडे गेले असता त्यांना तुम्ही जामीनदार घेऊन या असे सांगितले. अपंग महिलेचे पती खचून न जाता कांही सामाजिक संघटनेचे महापुरुषाच्या विचारावर चालणारे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी मा.सचिन ओबांसे साहेबांना भेटून सर्व हकीकत सांगितली व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली असता साहेबांनी त्यांच्या स्तरावरून वारसाला घरकुल मिळावे यासाठी पंचायत समितीस आदेश दिले व त्यांना पहिला हप्ता प्राप्त झाला. दिनांक ८ / १०/ २३ रोजी त्यांच्या घरकुलाचे भूमिपूजन धाराशिवचे आंबेडकरी चळवळीतील नेते मा.सिद्धार्थ बनसोडे व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी धाराशिवची टीम तसेच दलित पॅंथरचे धाराशिव जिल्हा प्रमुख मिलिंद गायकवाड, अँड शांतीबन कांबळे वंचितचे जिल्हा सहसचिव आर.एस. गायकवाड, डॉ. दयानंद कांबळे, इरफान अली खानापुरे,राज मुकरे यांच्या समवेत घुगे कुटुंबातील सर्व सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.अपंग महिलेचे पती व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने या संघर्षमय लढ्यात सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळीचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.
0 टिप्पण्या