Ticker

6/recent/ticker-posts

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आनणाऱ्या दोनजनास पाचोड पोलीसांनी केले जेरबंद


गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद मो.8308128457,


औरंगाबाद:- येथे बनावट नोटा बनवून चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्या नंतर ऐन दिपावली  सणाच्या धामधुमीत पैठण तालुक्यातील पाचोड जवळ पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पाचोड पोलिसांनी फर्दाफाश केला यामुळे एन दिपावली सणाच्या निमित्ताने बाजारात खरेदसाठी येणाऱ्या अनोळखी ग्राहकांकडे दुकानदारही संशयाच्या नजरेने पाहत असल्याचे चित्र बाजार पेठेत दिसत आहे.
या विषयी मिळालेली माहिती अशी की पाचोड येथे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी एक तरुण घेवुन येणार असल्याची खात्रीशीर माहिती पाचोड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश माळी यांना प्राप्त झाल्याने त्यांनी तत्काळ आपले वरिष्ठ सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांना या बद्दल माहिती दिली असता त्यांनी पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष माने  पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, पोना फिरोज बर्डे, अभिजीत सोनवणे,पवन चव्हाण यांच्या पथकाने तात्काळ आरोपीस पकडण्यासाठी सापळा रचला व पोलीसांना पाहीजे असलेला संशयीत पाचोड  सोलापूर हायवे वरील हॉटेल निसर्ग हॉटेल समोर आपली गाडी उभी करून जेवण करण्यासाठी थांबला असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली तेव्हां पोलीसांनी वेळ न दवडता त्या संशयीत तरुणाला नाव गाव विचारले असता त्यांने आपले नाव कुंदन सुधाकर जगताप वय २५, रा. अंकुशनगर महाकाळा ता. अंबड, जि. जालना) असल्याचे सांगितले तेंव्हा त्यांची तपासणी केली असता त्या संशयीत तरुणा जवळ पाचशे रुपयांच्या १३ बनावट नोटा सापडल्या त्यास आणखीन विचारपूस केली असता या नोटा माझा मित्र सचिन मधुकर जाधव रा. शहागड ता. अंबड याच्याकडून पाचशे रुपयात विकत घेतल्या असल्याचे सांगितले. तेंव्हा पोलीसांनी या तरुणाच्या घरी जावून घराची झडती घेतली असता आणखी पाचशे रुपयांच्या ३१ बनावट नोटा जप्त केल्या व सदरील नोटा या आप्पासाहेब पवार रा. शहागड यांनी दिल्याचे सांगितले. तेंव्हा पोलीसांनी सांगितल्या प्रमाणे त्या तरुणाच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो तरुण पोलिसांना घरी आढळून आला नाही. तेंव्हा पोलीसां नी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बनावट सणा सुदीत खरेदीच्या निमित्ताने बाजारात चलनात आणण्याच्या  इराद्याने जवळ बाळगल्या बद्दल ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे सपोनि संतोष माने यांनी सदरील आरोपी विरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ४ लाख ७५ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत पोलिस पथकाने बनावट नोटा प्रकरणी आरोपींना अटक केली व पुढील तपास सपोनि संतोष माने, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, पोना अभिजित सोनवणे  करीत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या