Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षकाने एकतर्फी प्रेमापायी मुलीला छळले, मुलीने केली आत्महत्या

रूपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-आसेगाव येथील कै. दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयातील ३५ वर्षीय शिक्षकाने वर्गातील नववीच्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमापायी छळ छळ छळले. त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येच्या तेरा दिवसांनी शिक्षक अजय जयवंत सासवडे याचा हा संतापजनक प्रकार समोर आला. दौलताबाद पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

नेहा (नाव बदलले आहे) दौलताबाद परिसरात आई, भावासह राहत होती. ती आठवीत असल्यापासून अजय तिला सातत्याने बोलण्यासाठी हट्ट करत होता. नेहाने शिक्षक असल्याने दुर्लक्ष केले. काही दिवसांनी मात्र त्याने बळजबरीने कॉल, मेसेज सुरू केले. भेटवस्तू आणून तिला घरी घेऊन जाण्यास धमकावत होता. जानेवारी २०२३ मध्ये कुटुंबाला याची कुणकुण लागल्यानंतर कुटुंब शाळेत गेले होते. कुटुंबाने नेहाला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, शाळेने ती हुशार आहे, तिला शिकू द्या, अजयला समजावण्याची जबाबदारी घेतली. नेहाने नंतर तक्रार न केल्याने कुटुंबाला त्रास संपल्याचे वाटले.

दि. १७ मे रोजी नेहाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या काही दिवसांनी आई नेहाचे दप्तर पाहत होती. तेव्हा त्यात स्मार्टवॉच आढळले. डिस्प्लेवर अजयचा वॉलपेपर होता. अजयनेच ते बळजबरीने दिल्याची आईला खात्री पटली. दोन पत्रेदेखील आढळली. अजयने नेहाला बळजबरीने प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते. आईने दौलताबाद पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक दीपक पारधे यांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची कोठडी सुनावल्याचे पारधे यांनी सांगितले. 

नेहाला होती डायरी लिहायची सवय 

 नेहाला डायरी लिहायची सवय होती. तिने इंग्रजी, मराठीतून अजयविषयी लिहिलेला 'मम्मी, सर घरी आले होते, मी तुला सांगू नाही शकले' असा मजकूर आढळला. त्यावरून अजयने तीच्या घरापर्यंत पाठलाग केल्याचे निदर्शनास आले. वडिलांच्या निधनानंतर वर्षभरातच नेहानेदेखील आयुष्य संपविल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या