मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-वसमत शहरातील पंचशील नगर ,कौठा रोड येथे भव्य बुद्ध विहाराचे बांधकाम येथील सदस्याच्या दानातुन व आमदार ,खासदार यांच्या फंडातुन , न.प. प्रशासनाच्या निधीतुन पूर्ण झालेले असुन सदरील भव्य बुद्ध विहारात थायलंड येथील श्रध्दावान बुद्धिस्ट ट्रस्ट ने बुध्द रुप मुर्तीस्वरूपात दान दिलेले आहे त्या रूपाच्या स्थापने निमित्त भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचे आयोजन दि. 2 जुन 2024 रविवार रोजी करण्यात आले आहे. सदरील बुध्द रूप थायलंड ते पूणे ते वसमत ट्रॅव्हलिंग खर्च स्मृतीषेश कांताबाई कुंडलीक मनोहरे यांच्या स्मरणार्थ मनोहरे परिवाराने केला आहे.
या प्रसंगी सकाळी 8:00 वाजता पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण सकाळी 9:00 वाजता धम्मरैली नंतर पुज्य भंदत धम्मसेवक महाथेरो,मुळावा , पुज्य भदंत डॉ. खेमधम्मो ,मुळवा, पुज्य भदंत एम सत्यपाल महाथेरो ,छत्रपती संभाजी नगर, पुज्य भंदत विनयबोधीप्रिय महाथेरो नांदेड ,पुज्यभदंत पय्याबोधी महाथेरो ,खुरगाव ,पुज्य भदंत ज्ञानरक्षित थेरो ,भंते रेवतबोधी , भंते बुद्धभुषन बावरीनगर, यांच्या द्वारे बुद्धरूपाची स्थापना व धम्मदेसना होनार असुन प्रमुख उपस्थीतीत माजी मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर व श्री डॉ. जयप्रकाश मुंदड़ा , आमदार राजुभैया नवघरे ,श्री शिवदास बोड्डेवार, श्री सुनिल काळे, डॉ. एम.आर. क्यातमवार, मा. अब्दुल हाफीज अब्दुल रहेमान यांच्या सह उपविभागीय अधिकारी डॉसचिन खल्लाळ, तहसीलदार शारदा दळवी मॅडम, मुख्याधीकारी न.प. निलेश सुंकेवार, पोलीस उपाधिक्षक मारोतराव थोरात , पोलिस निरिक्षक अनिल काचमांडे अदि मान्यवर उपस्थीत राहणार आहेत .
परिसरातील व तालुक्यातील बौद्ध अनुयायांनी धम्मदेसनेचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमास शुभ्र वस्त्र परिधान करूण उपस्थित राहावे असे अवाहन पंचशील नगर च्या वतीने करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या